Others News

कोरोना काळात अनेकांना आपला रोजगार गमावावा लागला, अनेकांची नोकरी गेली त्यामुळे बहुतेकांवर आर्थिक संकट ओढवलं. या कोरोना काळात अनेकजण आपला स्वत: चा व्यवसाय सुरू करू पाहत आहेत. परंतु पैशांची कमरता असल्याने हतबल झाले आहेत. अशा व्यक्तीसाठी मोदी सरकार योजनेच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे करत आहे.

Updated on 23 July, 2021 4:45 PM IST

कोरोना काळात अनेकांना आपला रोजगार गमावावा लागला, अनेकांची नोकरी गेली त्यामुळे बहुतेकांवर आर्थिक संकट ओढवलं. या कोरोना काळात अनेकजण आपला स्वत: चा व्यवसाय सुरू करू पाहत आहेत. परंतु पैशांची कमरता असल्याने हतबल झाले आहेत. अशा व्यक्तीसाठी मोदी सरकार योजनेच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे करत आहे.

या योजनेतून मोदी सरकार व्यवसायासाठी 10 लाख रुपयांचे कर्ज देत आहे. सरकारकडून गरीब आणि मध्यम वर्गातील लोकांच्या विकासासाठी अनेक योजना राबवत असते. कोरोना काळात अनेकांची कामे बंद पडली आहेत, यामुळे मोदी सरकार या नव्या योजनेमार्फत व्यवसाय परत चालू करण्याची संधी देत आहे. या संधीच्या माध्यमातू सरकार तब्बल 10 लाख रुपये व्यवसायासाठी कर्जाच्या रुपात देत आहे.

जाणून कशाप्रकारे मिळणार 10 लाख रुपये

छोटासा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा आपले जुने काम वाढवण्यासाठी सरकारने दहा लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. पीएम मुद्रा लोन योजना (PMMY Scheme) असे सरकारच्या या योजनेचे नाव आहे.

पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना (PMMY Scheme)

पंतप्रधान मुद्रा योजनेची (PMMY) सुविधा देण्यात आली आहे. जर तुम्हाला बँकांचे नियम नीट समजू शकले नाहीत किंवा तुम्हाला तुमचा स्टार्टअप सुरू करण्यासाठी पैशांची गरज असेल तर तुम्ही मुद्रा कर्ज योजनेचा लाभ घेऊ शकता.
मुद्रा कर्जावरील व्याज दर काय आहेत? (Mudra Loan Interest rate)?
पंतप्रधान मुद्रा योजनेंतर्गत कोणताही निश्चित व्याज दर नाही. मुद्रा कर्जासाठी बँका वेगवेगळे व्याज दर आकारू शकतात. साधारणत: किमान व्याज दर 12 टक्के असतो.

हेही वाचा : कमी खर्चात सुरू करा बटेर पालन अन् कमवा लाखो रुपये

कर्जाचा फायदा आपण तीन चरणात घेऊ शकता

तुम्हाला 3 चरणांमध्ये पंतप्रधान मुद्रा कर्जाचा लाभ मिळू शकेल. यातली पहिली पायरी म्हणजे शिशु लोन. याशिवाय दुसरा टप्पा किशोर कर्ज व तिसरा टप्पा तरुण लोनचा आहे.
1 शिशु कर्ज योजना- या योजनेंतर्गत तुम्हाला 50,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळेल.
2. किशोर कर्ज योजना- या योजनेतील कर्जाची रक्कम 50,000 ते 5 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.
3. तरुण कर्ज योजना- तरुण कर्ज योजनेंतर्गत 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतची कर्जे घेतली जाऊ शकतात.

 

या योजनेचा कोण फायदा घेऊ शकेल?

छोट्या व्यापाऱ्यांसाठी ही योजना खास सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत दुकानदार, फळ / भाजी विक्रेते, लघु उद्योग, अन्न-सेवा युनिट्स, दुरुस्ती दुकाने, मशीन ऑपरेशन्स, फूड प्रोसेसिंग युनिट्स सुरू करण्यासाठी कर्ज घेतले जाऊ शकते.

हेही वाचा : सौर पॅनेल्समधून दरमहा लाखो रुपये कमावण्याची संधी ; सरकारच्या या योजनेचा मिळेल फायदा

मी हे कर्ज कोठून घेऊ शकता?

हे कर्ज आपण कुठूनही सरकारी बँक, खाजगी बँका, विदेशी बँका, ग्रामीण बँका आणि सहकारी बँकांकडून घेऊ शकता. आरबीआयने मुद्रा कर्जाचे वाटप करण्यासाठी 27 सरकारी बँक, 17 खासगी बँक, 31 ग्रामीण बँक, 4 सहकारी बँक, 36 मायक्रो फायनान्स संस्था
आरबीआई ने 27 सरकारी बैंक, 17 प्राइवेट बैंक, 31 ग्रामीण बैंक, 4 सहकारी बैंक, 36 माइक्रो फाइनेंस संस्थान आणि 25 नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपन्यांना (एनबीएफसी) मुद्रा कर्ज वितरित करण्यास अधिकृत करण्यात आले आहे.

आपण हे कर्ज कसे घेऊ शकता(How to apply for Mudra Loan)

आपल्याला अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.( http://www.mudra.org.in/)
 येथून आपल्याला कर्ज अर्ज फॉर्म डाउनलोड करावा लागेल.
 शिशु कर्जासाठी फॉर्म भिन्न आहे. तर किशोर आणि तरुण यांचा एकच फॉर्म आहे.
कर्जाच्या अर्जामध्ये मोबाइल नंबर, आधार क्रमांक, नाव, पत्ता इत्यादी तपशील द्या.
 2 पासपोर्ट फोटो जोडा.
 फॉर्म भरल्यानंतर कोणत्याही सार्वजनिक किंवा खासगी बँकेत जा आणि सर्व प्रक्रिया पूर्ण करा.
बँकेचे शाखा व्यवस्थापक आपल्याकडून या कार्याबद्दल माहिती घेतातत्या आधारावर आपल्याला PMMY चे कर्ज मंजूर केले जाते.

 

प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे काय फायदे आहेत (PMMY Scheme)?

  • मुद्रा योजनेंतर्गत हमीशिवाय कर्जे उपलब्ध आहेत. याशिवाय कर्जासाठी कोणतीही प्रक्रिया शुल्कही आकारले जात नाही.
  • मुद्रा योजनेतील कर्जाची परतफेड कालावधी 5 वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकतो.
English Summary: Starting a business? Then the central government will give Rs 10 lakh, find out how to take benefit
Published on: 23 July 2021, 04:42 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)