कोरोना नामक महाभयंकर आजारापासून देशात सर्वत्र मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली आहे. भारतात वाढता बेरोजगारी दर मोठ्या चिंतेचा विषय बनत चालला आहे. तसेच अनेक लोकांना नोकरीतून प्राप्त होणारे मानधन अपुरे वाटते आणि त्यातून त्यांचा व त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह भागत नाही. त्यामुळे अनेक लोक स्वतःचा व्यवसाय करू पाहतात मात्र व्यवसायाची योग्य ती माहिती नसल्याने इच्छा असून देखील त्यांना व्यवसाय करण्यात नाना प्रकारचे अडथळे निर्माण होतात. आज आपण व्यवसाय करू इच्छिणाऱ्या नव युवकांसाठी दोन व्यवसायाच्या कल्पना घेऊन आलो आहोत. आज आम्ही ज्या व्यवसायाची आपणास माहिती सांगणार आहोत ते व्यवसाय कमी इन्वेस्टमेंट मध्ये सुरू करता येतात, तसेच या व्यवसायातून चांगली कमाई देखील करता येऊ शकते. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
ज्वेलरी बनवण्याचा व्यवसाय
आजचा काळ जितका वेगाने बदलत आहे तितक्याच लोकांच्या आवडीनिवडीही बदलत आहेत. असे म्हटले जाते आणि मानले जाते की बदलत्या काळानुसार मानवाची जीवनशैली देखील मोठ्या प्रमाणात बदलली आहे. बदलत्या काळानुसार झालेल्या अमुलाग्र बदलमध्ये लोकांची फॅशन देखील मोठ्या प्रमाणात बदलली आहे. लोकांचे कपडे असो वा दागिने सगळ्याच गोष्टीत मोठा बदल घडून आला आहे. बदलत्या काळानुसार चांगले दिसणे अपरिहार्य झाले आहे. बदलत्या काळानुसार स्त्रियांच्या राहणीमानात मोठा बदल घडून आला आहे. प्रत्येक स्त्रीला चांगले दिसायचे असते आणि त्यासाठी कपडे आणि दागिने हे चांगले असणे अनिवार्य आहे आणि हा एक सर्वात चांगला मार्ग आहे, परंतु आजच्या काळात सोन्याचे दागिने घालणे शक्य नाही. म्हणूनच बहुतेक मुली आणि महिलांना आर्टिफिशियल ज्वेलरी बाळगायला आवडते आणि आता या दागिन्यांमध्ये नवीन डिझाईन्स येत आहेत.
जर तुमच्याकडे अशा काही कल्पना असतील ज्याद्वारे तुम्ही नवीन डिझाइनचे दागिने बनवू शकता, तर तुम्ही हा व्यवसाय कमी गुंतवणुकीत सुरु करू शकता. आर्टिफिशियल ज्वेलरी बनविण्याचे काम अथवा व्यवसाय आपण आपल्या घरातूनच सुरू करू शकता. यासाठी खूपच कमी भांडवल आवश्यक असते मात्र हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपणांस आर्टिफिशियल ज्वेलरी बनवण्याचे कौशल्य अवगत असणे अनिवार्य आहे.
महिलासाठी जिम
जर आपण स्वतःचा एक व्यवसाय सुरू करू इच्छित असाल आणि आपणास फिट राहणे तसेच व्यायाम करणे पसंत असेल तर आपण महिलांसाठी जिम ओपन करून आपली आवडही जोपासू शकता शिवाय यामुळे आपणही फिट राहणार आणि दुसऱ्यांना देखील फिट बनवू शकता. तसेच यातून आपणास चांगली मोठी कमाई देखील होऊ शकते. जर तुमच्याकडे चांगली खुली जागा असेल आणि तुम्हाला जिम किंवा त्यासंबंधीच्या गोष्टींबद्दल चांगले ज्ञान असेल, तर हा व्यवसाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की, आजच्या काळात प्रत्येक स्त्री तिच्या वजन आणि दिसण्याबाबत खूप जागरूक आहे.
त्यांचं वजन थोडंही वाढलं, तर त्यासाठी ते थेट जिममध्ये जातात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही महिलांसाठी जिम उघडली तर ही एक चांगली कल्पना आहे आणि यातून आपण चांगला पैसा कमवू शकता. कमी मशिन्स असतानाही तुम्ही महिलांसाठी जिम सुरू करू शकता. यात फक्त काही अत्यावश्यक मशिन्सची गरज आहे. त्यामुळे या जीममधील गुंतवणूक पुरुषांच्या जिमपेक्षाही कमी आहे आणि त्यातून तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता.
Published on: 13 February 2022, 04:08 IST