Others News

मित्रांनो जर आपण नोकरी करत असाल मात्र नोकरीतून प्राप्त होणाऱ्या मानधनातून आपला उदरनिर्वाह भागत नसेल किंवा आपणास अतिरिक्त पैशासाठी व्यवसाय सुरु करायचा असेल मात्र व्यवसायाची कल्पना सुचत नसेल तर आज आपल्यासाठी ही बातमी विशेष फायदेशीर ठरू शकते. कोरोना मुळे अनेक लोकांचे रोजगार गेलेत तसेच काहींच्या नोकरीवर विपरीत परिणाम झाला असून पगारात मोठी कपात करण्यात आली आहे त्यामुळे अनेक लोक व्यवसाय करण्याचा विचार करत आहेत. अशा लोकांसाठी आज आम्ही व्यवसायाच्या कल्पना घेऊन आलो आहोत. यातील कुठलाही एक व्यवसाय करून आपण चांगली मोठी कमाई करू शकता.

Updated on 07 February, 2022 9:23 PM IST

अनेक लोकांचा असा समज असतो की व्यवसाय करण्यासाठी लाखो रुपयांची आवश्यकता भासत असते, काही अंशी ही बाब खरी देखील आहे मात्र असे अनेक व्यवसाय आहेत जे कमी भांडवलात सुरु केले जाऊ शकतात आणि त्यातून चांगली मोठी कमाई केली जाऊ शकते. आज आपण कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये हाय प्रॉफिट देणाऱ्या व्यवसाय विषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी.

चॉक मेकिंग बिझनेस- चोक मेकिंग बिझनेस हा नेहमीच प्रॉफिटेबल सिद्ध होत असतो. चोक ची मागणी सदैव बाजारात कायम असल्याने हा व्यवसाय कधीच मंदीचा सामना करत नाही. या व्यवसायाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हा व्यवसाय कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये आणि आपण राहत असलेल्या ठिकाणाहून करता येणे शक्य आहे. मित्रांनो शाळा-कॉलेजमध्ये तसेच अनेक ऑफिस कामासाठी चॉकचा उपयोग होत असतो त्यामुळे आपण हा व्यवसाय करून चांगली मोठी कमाई करू शकता.

चॉक मेकिंग बिझनेस सुरू करण्यासाठी जास्त सामग्रीची आवश्यकता भासत नाही हा व्यवसाय केवळ दहा हजार रुपयात सुरू केला जाऊ शकतो. आपण व्हाईट चॉकसोबत रंगीत चौकची देखील निर्मिती करू शकता.

बिंदी मेकिंग बिजनेस- बिंदी मेकिंग बिजनेस हा एक फायद्याचा सौदा सिद्ध होऊ शकतो कारण की, सध्या बाजारात बिंदीची मागणी लक्षणीय वाढली आहे. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पूर्वी फक्त विवाहित महिलाच बिंदी अर्थात टिकली लावत असत, मात्र आता मुली देखील बिंदी लावतात. बिंदी लावण्याचा सध्या ट्रेंड सुरू आहे, त्यामुळे आपण याचा फायदा उचलून चांगली कमाई करू शकता. एवढेच नाही तर परदेशातही भारतीय संस्कृतीचा मोठ्या प्रमाणात विस्तार होत आहे. 

त्या अनुषंगाने आता विदेशी महिलांनी देखील बिंदी लावण्यास सुरुवात केली आहे. या एकंदरीत तयार झालेल्या परिस्थितीमुळे याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. आपण हा व्यवसाय केवळ 12 हजार रुपये गुंतवून सुरु करू शकता. तसेच या व्यवसायाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हा व्यवसाय आपण राहत असलेल्या ठिकाणाहून देखील केला जाऊ शकतो.

English Summary: start these business at just rs 10000 and earn lakhs
Published on: 07 February 2022, 09:23 IST