Others News

देशात सर्वत्र मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे, वाढता बेरोजगारी दर जरी चिंतेचा विषय असला तरीदेखील यामुळे युवकांमध्ये व्यवसाय करण्याची जिद्द निर्माण होत आहे. असे म्हटले जाते की "जो होता है वह अच्छे के लिए होता है" या उक्तीप्रमाणे बेरोजगारी वाढली मात्र यामुळे व्यवसाय करणाऱ्यांची संख्या देखील वाढली. अनेक नवयुवक तरुण व्यवसायातून नोकरीपेक्षा अधिक पैसा प्राप्त करीत आहेत शिवाय स्वतःचे मालक स्वतः बनले आहेत. आज आम्ही आमच्या नवयुवक वाचक मित्रांसाठी तसेच गृहिणींसाठी एका विशिष्ट अशा व्यवसायाची माहिती घेऊन आलो आहोत.

Updated on 07 March, 2022 12:31 PM IST

मित्रांनो आपल्या देशात अन्न हेच परब्रह्म असे मानले जाते त्यामुळे आज आम्ही आपणास लोकांना पोटभर खाऊ घालून देखील पैसे कमवणे शक्य आहे याविषयी सांगणार आहोत. मित्रांनो आम्ही आपणास टीफिन सर्विस बिझनेस अथवा मेसचा डब्बा या व्यवसायाविषयी काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. मित्रांनो जसं की आपणांस माहितचं आहे की, आजकाल, प्रत्येक शहरात विद्यार्थी शिक्षणासाठी आणि नोकरदार लोक नौकरीसाठी वास्तव्यास असतात. यामध्ये अनेक अशा बॅचलर मुलांचा समावेश असतो, ज्यांना स्वतःहून जेवण बनवता येत नाही, म्हणून त्यांना टिफिन सेवा आवश्यक आहे.

एवढेच नाही तर काही नवरा बायको दोन्हीपण नोकरी-व्यवसायात असतात अशा लोकांना देखील जेवण बनविणे शक्य होत नाही. म्हणून या लोकांना देखील टिफिन सेवा आवश्यक असते. अशा परिस्थितीत, त्या लोकांची मागणी पूर्ण करण्यासाठी तुम्ही टिफिन सेवा व्यवसाय सुरू करू शकता.  या व्यवसायात मुख-प्रसिद्धी अधिक यशस्वी होत असल्याचे मानले जाते. म्हणुन टिफिन सेवा व्यवसाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो.

मित्रांनो या व्यवसायाचे सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे या व्यवसायासाठी आपणास कुठलीच अतिरिक्त जागा लागत नाही हा व्यवसाय आपण आपल्या राहत्या घरी देखील सुरू करू शकता. तसेच या व्यवसायासाठी अधिक भांडवलाची आवश्यकता नसते, आपण हा व्यवसाय केवळ दहा हजार रुपयांच्या भांडवलात सुरू करू शकता. मित्रांनो जर आपण 50 ग्राहक जरी जोडले तरी आपण दीड लाख रुपये महिना कमवू शकता यामध्ये आपला निव्वळ प्रॉफिट चाळीस ते पन्नास हजारच्या घरात राहू शकतो.

English Summary: start these business and earn 1.5 lakh month know more about it
Published on: 07 March 2022, 12:31 IST