कृषीप्रधान भारत देशातील शेतकरी आता शेतीसमवेतच शेतीपूरक व्यवसाय करून लाखों रुपये नफा कमवीत आहेत. शेती क्षेत्रमध्ये काळानुरूप अमुलाग्र बदल घडवून आणणे गरजेचे बनले आहे. फक्त शेती करून शेतकऱ्यांना उत्पन्न वाढवता येणे शक्य नाही त्यासाठी शेतकरी बांधवांना शेतीपूरक व्यवसाय करण्याची गरज आता निर्माण झाली आहे. आज आपण पर्ल फार्मिंग या शेती पूरक व्यवसाय विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो जर आपणास हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर केंद्र शासन या व्यवसायासाठी अनुदान देखील उपलब्ध करून देत आहे त्यामुळे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी गरजेचे भांडवल देखील सहज रित्या उपलब्ध होऊ शकते.
या व्यवसायासाठी केंद्र शासनाद्वारे तब्बल 50 टक्क्यांपर्यंत चे अनुदान दिले जात असल्याने अनेक शेतकरी बांधव या शेतीकडे विशेष आकृष्ट होत आहेत. अनेक शेतकरी बांधवांनी हा शेतीपूरक व्यवसाय सुरू करून लाखो रुपयांची कमाई केली आहे. मित्रांनो जर आपणास देखील लाखो रुपयांची कमाई करायची असेल तर आपण पर्ल फार्मिंग हा शेतीपूरक व्यवसाय सुरू करून मोठा नफा अर्जित करू शकतात.
पर्ल फार्मिंग साठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी
पर्ल फार्मिंग मध्ये आपणांस एका तलावाची आणि काही जिवंत शिंपले याची आवश्यकता भासणार आहे. याव्यतिरिक्त पर्ल फार्मिंग मध्ये यशस्वी होण्यासाठी आपणास काही दिवसांची ट्रेनिंग देखील करणे अनिवार्य असणार आहे. पर्ल फार्मिंग मध्ये ट्रेनिंग विना यश संपादन करता येणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो जेव्हा आपणास हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आधी आपणास या व्यवसायाविषयी आवश्यक असणारे प्रशिक्षण जरूर घ्यावे लागणार आहे. यासाठी आवश्यक असणारे तलाव आपण स्वतःच्या खर्चाने तयार करू शकतात आणि नंतर यासाठी शासनाद्वारे दिल्या जाणाऱ्या अनुदानाचा लाभ घेऊ शकतात. या व्यवसायासाठी आवश्यक सिंपले भारतातील अनेक राज्यात उपलब्ध होतात. असे असले तरी बिहार राज्यातील दरभंगा जिल्ह्यात असणाऱ्या शिंपल्यांची क्वालिटी उत्तम असल्याचे सांगितले जाते. पर्ल फार्मिंग साठी अनेक ठिकाणी प्रशिक्षण देखील दिले जाते यामध्ये एमपी मधील होशंगाबाद आणि आपल्या राज्यातील मुंबई प्रमुख स्थाने आहेत.
या पद्धतीने करा मोतीची शेती
मोतीच्या शेतीला प्रारंभ करण्यापूर्वी बाजारातून आणलेले जीवित शिंपले ज्या तलावात आपणास मोती शेती सुरू करायचे आहे त्या तलावात पंधरा दिवस एका जाळ्यात बांधून सोडावी लागतात, यामुळे जीवित शिंपले तलावातील वातावरण सहन करण्यास सक्षम बनतात. एवढे केल्यानंतर शिंपले बाहेर काढले जातात आणि त्यानंतर शिंपल्यावर सर्जरी केली जाते. शस्त्रक्रियामध्ये ऑयस्टरच्या अर्थात शिंपल्याच्या आत एक कण किंवा साचा टाकला जातो. या साच्यावर कोटिंग केल्यावर सिपचा थर तयार केला जातो, जो नंतर मोती बनतो.
मोती शेतीचे गणित
एका शिंपल्यापासून मोती बनण्यासाठी जवळपास 35 रुपये खर्च अपेक्षित असतो. आणि एका शिंपल्यापासून दोन मोती तयार होत असतात. बाजारपेठेत एका मोती ची किंमत जवळपास सव्वाशे रुपये एवढी असते. जर मोतीची क्वालिटी चांगली राहिली तर मोतीला 200 रुपये पर्यंत दर मिळत असतो. शेतकरी मित्रांनो जर आपण एक एकर क्षेत्रात असलेल्या तलावात मोतीशेती करण्यास प्रारंभ केला तर आपण आज जवळपास 25 हजार शिंपल्यांची आवश्यकता भासणार आहे, आणि यासाठी जवळपास आठ लाख रुपये खर्च अपेक्षित असतो. टाकलेल्या 25 हजार शिंपल्यापैकी 50% शिंपले निकामी जरी झाली तरी यातून 30 लाखांची कमाई करता येणे शक्य असल्याचे सांगितले जाते.
Published on: 24 February 2022, 04:44 IST