Others News

वाढत्या महागाईमुळे नवनवीन गोष्टी शेतकऱ्यांसाठी चांगले उत्पन्नाचे साधन बनू शकतात. त्याचप्रमाणे शेतकरी कमी भांडवलात मोती शेती व्यवसाय सुरू करू शकतात.

Updated on 06 June, 2022 1:53 PM IST

 वाढत्या महागाईमुळे नवनवीन गोष्टी शेतकऱ्यांसाठी चांगले उत्पन्नाचे साधन बनू शकतात. त्याचप्रमाणे शेतकरी कमी भांडवलात मोती शेती व्यवसाय सुरू करू शकतात.

आज आपण या लेखामध्ये पाहणार आहोत की अवघ्या पंचवीस हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून मोतीच्या शेतीतून लाख रुपये कसे कमवता येतात आणि त्यासाठी हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करायचा असेल तर सरकारकडून त्यासाठी 50 टक्‍क्‍यांपर्यंत सबसिडी देखील मिळते.

 मोती लागवडीसाठी आवश्यक गोष्टी

मोत्यांच्या शेतीसाठी तलावाची गरज असून त्यात शिंपल्यांचा महत्त्वाचा वाटा आहे.शेती सुरू करण्यापूर्वी शासनाकडून राज्य स्तरावर प्रशिक्षण देखील दिले जाते. सरकार कडून नवीन स्टार्टअप ना प्रोत्साहन दिले जात आहे, ज्यामध्ये नवीन व्यवसायाला सबसिडी दिली जाते.

स्टार्ट अप इंडिया अंतर्गत देशातील स्टार्टअपआणि नवीन कल्पना साठी एक मजबूत इकोसिस्टम तयार करायचे आहे, जेणेकरून देशाचा आर्थिक विकास होईल आणि मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

नक्की वाचा:महत्वाची व्यवसायिक कल्पना! अगदी कमीत कमी गुंतवणूक आणि जागेत करा हा व्यवसाय सुरू, महिन्याकाठी कमवा खूप चांगला नफा

 व्यवसाय कसा सुरु करावा?

मोत्यांची शेती सुरू करण्यापूर्वी शेतकऱ्यांना कुशल शास्त्रज्ञांकडून प्रशिक्षण घ्यावे लागते.तुम्ही अनेक सरकारी संस्थांमध्ये मोफत प्रशिक्षण देखील घेऊ शकतात.प्रशिक्षणानंतर आपण सरकारी संस्था किंवा मच्छीमारांकडून ऑईस्टर खरेदी करू शकतात.

मोत्यांच्या शेती साठी निवडलेले शिंपले जाळ्यात व्यवस्थित बांधून तलावात अशाप्रकारे टाकले जातात जेणेकरून ते तलावात स्वतःसाठी चांगले वातावरण निर्माण करून चांगले उत्पादन करू शकतील. नंतर ते बाहेर काढले जातात आणि चांगले ऑपरेट केले जातात.

साच्यात कोणताही आकार घालून तुम्ही त्या डिझाइनचा मोती तयार करू शकतात.डिझायनर मोत्यांना बाजारात जास्त मागणी आहे.दक्षिण भारत आणि बिहारमधील दरभंगाच्या ओयस्टरची गुणवत्ता खूप चांगले आहे.

नक्की वाचा:उपयुक्त योजना!'या' घटकांना मिळते या योजनेअंतर्गत शेतजमीन,वाचा आणि जाणून घ्या या योजनेच्या पात्रता आणि अटी

प्रति महिना किती कमाई होईल?

 यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक ओयस्टर  तयार करण्यासाठी सुमारे 25 ते 35 रुपये खर्च येतो आणि एका ऑईस्टर पासूनदोन मोती तयार करता येतात.त्याच वेळी एका मोत्याची किंमत 130 रुपयांपर्यंत आहे आणि चांगल्या प्रतीच्या मोती दोनशे रुपयांपर्यंत विकले जाऊ शकतात.

एक एकर तलावांमध्ये 25000 सिंपले ठेवता येतात.जर तुम्ही पंचवीस हजार रुपयांना एक हजार ऑईस्टर खरेदी केले तर तुम्हाला एक हजार ओयस्टर पैकीसुमारे 1500 ओयस्टर मिळू शकतात.150 सरासरीने तुमच्या मोत्यांची किंमत दोन लाखाच्या वरती जाईल.

नक्की वाचा:Organic Jaggery: सेंद्रिय गुळ आहे आरोग्यासाठी उत्कृष्ट, सेंद्रिय गूळ निर्मितीतून कमवाल चांगला नफा

English Summary: start the pearl farming in 25 thousand investment and earn more profit
Published on: 06 June 2022, 01:53 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)