सध्या पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला पोचले असल्याने वाहने हे परवडेनाशी झाली आहेत.सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात येत असून बऱ्याच जणांचा कल इलेक्ट्रिक बाइक घेण्याकडे वळताना दिसत आहे.
या इलेक्ट्रिक वाहनांना चार्जिंग ची आवश्यकता असते. त्यासाठी शहरांमध्ये आणि गावात चार्जिंग स्टेशन असणे फार आवश्यक आहे.इलेक्ट्रिक स्कूटर आणि कारची ग्राहक मोठ्या संख्येने वाढत असताना या संधीचा फायदा घेऊनचार्जिंग स्टेशन उघडल्यास फार मोठा फायदा होऊ शकतो. या लेखात आपण चार्जिंग स्टेशन कसे उघडायचे? त्याबद्दलची माहिती घेऊ.
चार्जिंग स्टेशन उघडण्याची पद्धत
इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग करण्यासाठी पब्लिक चार्जिंग स्टेशन उघडण्यासाठी एक विशेष ट्रांसफार्मर असणे आवश्यक आहे.
त्यामध्ये प्लगइन नोझल 33/11केव्ही केबल, सर्किट ब्रेकर असणे आवश्यक आहे. चार्जिंग स्टेशन मध्ये किमान एक इलेक्ट्रिक किओस्क असणे देखील आवश्यक आहे. ज्यामध्ये अनेक चार्जिंग पॉईंट्स असतील आणि त्यात गरजेनुसार वाढ ही करता येईल.
यासाठी केलेला गुंतवणूक खर्च चार वर्षात होऊ शकतो वसूल
पब्लिक चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी कमीत कमी तीनशे ते पाचशे चौरस फूट जागेची आवश्यकता असते.जेणेकरून एकाच वेळी दोन ते तीन कार सहजरीत्या चार्जिंग करता येतील.
फास्ट चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी 16.5लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. यामध्ये वीज, देखबाल, चार्जिंग उपकरणे अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. जर तुम्ही चार्जिंग स्टेशन सोळा तास सुरू ठेवल्यास प्रतियुनिट साडेतीन रुपये दराने शुल्क आकारून चार वर्षांतच तुमचा संपूर्ण खर्च वसूल करू शकता.
Published on: 18 January 2022, 05:47 IST