जर आपण नौकरी करत असाल आणि त्याला जोड म्हणुन अतिरिक्त इनकमसाठी व्यवसाय करायचा विचार असेल. अथवा आपण बेरोजगार असाल आणि फुल टाइम व्यवसाय करण्याच्या विचारात असाल तर आज आम्ही आपणासाठी एक भन्नाट व्यवसायाची कल्पना घेऊन आलो आहोत. हा व्यवसाय सुरू करून आपण महिन्याला हजार रुपये कमवू शकता. आम्ही ज्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत तो व्यवसाय आहे मग प्रिंटिंगचा. आपण मग प्रिंटिंगचा बिझनेस छोट्याशा जागेत सुरू करू शकता यासाठी आपण आपल्या घराचा देखील वापर करू शकता
हा बिझनेस अगदी कमी भांडवलात सुरु केला जाऊ शकतो, तसेच या सोबतच आपण मोबाईल बॅक कव्हर प्रिंटिंग, टी शर्ट प्रिंटिंग, इत्यादीदेखील काम करू शकता. अलीकडे प्रिंटेड वस्तूंची खूप डिमांड वाढली आहे, अनेक लोक बर्थडे गिफ्ट एनिवर्सरी गिफ्ट तसेच अनेक शुभ कार्यात असे प्रिंटेड गिफ्ट देणे पसंत करतात. त्यामुळे आज आपण मग प्रिंटिंग बिझनेस विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या विषयी सविस्तर.
मग प्रिंटिंग बिझनेस साठी लागणारे रॉ मटेरियल
सब्लिमेशन मग -75/पिस
सबलिमेशन पेपर: 230 रुपये प्रति 20 नग
प्रिंटिंग पेपर: 330 रु
सबलिमेशन टेप : रु.300 (20 मिमी)
मग प्रिंटिंग व्यवसाय साठी लागणारी मशिनरी
कॉम्प्युटर ज्यामध्ये कोरल ड्रॉ आणि फोटोशॉपचे सॉफ्टवेअर असणे गरजेचे असते.
कॉम्प्युटर समवेतच प्रिंट करण्यासाठी आपणास एका प्रिंटरची आवश्यकता लागेल.
आपण जिथे आपला व्यवसाय सुरू करू इच्छितात इथे आपणास इंटरनेट कनेक्टिव्हिटी देखील घ्यावी लागेल, इंटरनेट कनेक्टिव्हिटी आपल्याला ब्राऊज करण्यासाठी गरजेचे असते.
जेव्हा तुमचे डिझाईन प्रिंट आऊट होऊन बाहेर निघेल त्यानंतर आपणास मग प्रिंटिंग साठी एक मशीन देखील खरेदी करावी लागेल.
आपणास सब्लिमेशन प्रिंटर तीस हजार रुपयात मिळून जाईल.आणि मग प्रिंटिंग मशीन साठी पाच हजार रुपये मोजावे लागतील.
मग प्रिंटिंग बिजनेस मधून प्राप्त होणारा नफा आणि लागणारा खर्च
असे सांगितले जाते की मग वर छपाई करण्यासाठी केवळ 2 रुपये खर्च येतो, आणि सब्लीमिशन मग 75 रुपयाला भेटतो. म्हणजे एका मग 77 रुपये खर्च येतो आणि एक मग बाजारात जवळपास तीनशे रुपयांना विकला जातो. म्हणजे एका मगाच्या विक्रीतून आपण जवळपास दोनशे वीस रुपये कमवु शकता. जर आपण महिन्याला 500 मग प्रिंटिंग करून विकले तर आपणास जवळपास एक लाख रुपये प्रॉफिट राहू शकतो. आम्ही सांगितलेला आकडा हा अंदाजीत आहे यामध्ये कमी-जास्त होऊ शकते.
Published on: 27 December 2021, 01:33 IST