Others News

शेतकरी मित्रांनो आज आपण शेतीसमवेत केल्या जाणाऱ्या एका पूरक व्यवसायाची माहिती जाणून घेणार आहोत. अनेक शेतकरी बांधव आपले उत्पन्न वाढवण्यासाठी शेती पूरक व्यवसाय करत असतात. शेती पूरक व्यवसायात सर्वात जास्त पशूपालन केले जाते. आज आपण मधमाशी पालन व्यवसायाविषयी जाणून घेणार आहोत. मधमाशी पालन करून शेतकरी बांधव चांगली मोठी कमाई करू शकता. मधमाशी पालन करण्यासाठी अतिशय कमी भांडवलाची गरज असते शिवाय यातून सुरुवातीपासूनच चांगली मोठी कमाई केली जाऊ शकते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी शेतकरी मित्रांना केंद्र सरकार द्वारे प्रोत्साहित देखील केले जात आहे. तसेच मधमाशी पालनातून मिळणाऱ्या प्रोडक्सची खूप मोठी डिमांड मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्यामुळे हा व्यवसाय शेतकरी बांधवांसाठी फायद्याचा सौदा सिद्ध होऊ शकतो.

Updated on 10 January, 2022 9:54 PM IST

मधमाशी पालनातून मिळणाऱ्या प्रोडक्स मध्ये मधाचा देखील समावेश होतो. मधाचा उपयोग अनेक आयुर्वेदिक औषधात तसेच खाण्यापिण्याच्या वस्तूमध्ये केला जातो. देशात आता मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव मधमाशी पालन करताना दिसत आहेत. हा व्यवसाय करण्यासाठी केंद्र सरकार देखील मदत करते त्यामुळे शेतकरी बांधव या व्यवसायाकडे आकृष्ट झालेले नजरेस पडत आहे. मधमाशी पालन केल्यामुळे फळबाग लागवडित देखीलमोठ्या प्रमाणात फायदा मिळत असतो. शेतकरी बांधवांनो जसं की आपणास ठाऊकच आहे फळबाग लागवडीत फुलांचे परागीभवन होणे महत्त्वाचे असते आणि याच कामासाठी मधमाशी मदत करत असतात. त्यामुळे मधमाशीपालन करून चांगले उत्पन्न तर अर्जित करता येते शिवाय यामुळे फळबागांना देखील मोठा फायदा मिळतो त्यामुळे मधमाशीपालन शेतकऱ्यांना दुहेरी फायदा देणारे ठरते. मधमाशी पालन करून व हनी प्रोसेसिंग युनिट लावून मधमाशी पालन करणारे शेतकरी चांगली मोठी कमाई करू शकतात.

मधमाशीपालनातून केवळ मध किंवा मेणच मिळते असे नाही, तर त्यापासून इतरही अनेक गोष्टी मिळतात. जसे की मेण, रॉयल जेली, प्रोपोलिस किंवा बी गम, मधमाशी परागकण इत्यादी. या सर्व उत्पादनांना बाजारात मोठी मागणी असते त्यामुळे मधमाशी पालन एक फायद्याचा सौदा सिद्ध होत आहे.

कमी भांडवलात मधमाशी पालन सुरु करता येते

शेतकरी बांधवांनो जर आपणास मधमाशी पालन करायचे असेल तर अवघ्या 35 हजार रुपयात आपण मधमाशी पालन सुरु करू शकता. आपण सुरुवातीला 10 बॉक्स मधमाशी घेऊन देखील हा व्यवसाय सुरू करू शकता. या 10 बॉक्समधून आपणास जवळपास 400 किलो ग्रॅम मध प्राप्त होऊ शकते.

जर आपण साडेतीनशे रुपये किलो ग्रॅम प्रमाणे मध विक्री केली तर आपणास एक लाख 40 हजार रुपये यातून प्राप्त होतील. मधमाशीचा एक बॉक्स जवळपास 3500 रुपयाला मिळतो याप्रमाणे आपणास 10 बॉक्स साठी 35 हजार रुपये खर्च येतो. म्हणजे आपणास यातून जवळपास एक लाख रुपये निव्वळ नफा प्राप्त होतो.

English Summary: start bee keeping business and earn lakh of rupees learn more about it
Published on: 10 January 2022, 09:54 IST