अलीकडे अनेक सुशिक्षित तरुण नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करायला अधिक पसंती दर्शवीत आहेत. हजारो रुपयांची नोकरी करण्यापेक्षा लाखो रुपयांचा व्यवसाय करण्याचे तरुणांचे स्वप्न असते. मात्र असे असले तरी अनेक सुशिक्षित तरुणांच हे स्वप्न पैशाअभावी पूर्ण होऊ शकत नाही. बिझनेस करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते असा या तरुणांचा समज आहे. मात्र असे काहीही नाही बिझनेस करण्यासाठी जास्त इन्व्हेस्टमेंट ची नाहीतर कठोर परिश्रमाची आणि जिद्दीची आवश्यकता असते. आज आपण अशाच तरुण मित्रांसाठी कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये सुरू करता येणाऱ्या एका व्यवसायाविषयी जाणून घेणार आहोत. मित्रांनो या व्यवसायाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हा व्यवसाय केवळ पन्नास हजार रुपयात सुरू करता येऊ शकतो आणि यातून तब्बल महिन्याकाठी एक लाख रुपयांपर्यंत कमाई केली जाऊ शकते मात्र यासाठी कठोर परिश्रमाची आवश्यकता भासणार आहे तसेच या व्यवसायात यश मिळविण्यासाठी सातत्य असणे देखील गरजेचे ठरणार आहे.
मित्रांनो आमच्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत तो व्यवसाय आहे केळीचे चिप्स बनवणे. केळी ही मानवी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते त्यामुळे केळीचे चिप्स ची नेहमीच बाजारात मागणी बघायला मिळते. केळीचे चिप्स उपवासासाठी देखील खाल्ले जातात त्यामुळे देखील या चीप्सला लक्षणीय मागणी असते. बटाट्याचे चिप्स पेक्षा केळीच्या चिप्सला लोक अधिक पसंती दर्शवित असतात त्यामुळे या व्यवसायासाठी खूप मोठे मार्केट असल्याचे सांगितले जाते. परंतु असे असले तरी केळीचे चिप्स कोणत्याच ब्रॅंडेड कंपन्या बनवीत नाहीत, त्यामुळे या गोष्टीचा फायदा उचलून आपण हा व्यवसाय सुरू करून चांगली मोठी कमाई करू शकता.
केळीचे चिप्स बनविण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी मशिनरी
केळीचे चिप्स बनण्यासाठी अनेक मशिनरी उपयोगात आणले जातात, तसेच केळी चिप्स बनण्यासाठी कच्च्या मालाची आवश्यकता भासत असते. कच्चा माल मध्ये केळी, मीठ, मसाला इत्यादी वस्तूंचा समावेश असतो. तसेच केळीचे चिप्स बनवण्यासाठी काही मशीन्स देखील आवश्यक असतात, या बिझनेस साठी लागणारी मशीन खालीलप्रमाणे
•केळी धुण्यासाठी टाकी तसेच केळी किसन्यासाठी मशीन
•केळीचे बारीक-बारीक तुकडे करण्यासाठी लागणारे मशीन
•केळ्याचे तुकडे फ्राय करण्यासाठी लागणारे मशीन
•मीठ मसाले इत्यादी केळीच्या चिप्सला लावण्यासाठी लागणारे मशीन
•केळी चिप्सचे पाऊच प्रिंट करण्यासाठी लागणारी मशीन
•प्रयोग शाळेचे उपकरण
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपणास एका जागेची आवश्यकता भासणार आहे हा व्यवसाय आपण आपण राहत असलेल्या घरात देखील सुरू करू शकता, मात्र असे असले तरी आपल्या घरात कमीत कमी 4 हजार ते 5 हजार स्क्वेअर फूट जागा या मशीन साठी उपलब्ध असणे अनिवार्य आहे. मित्रांनो या व्यवसायासाठी लागणारे मशीन आपण अलीबाबा अथवा इंडियामार्ट या ऑनलाईन साइटवरून खरेदी करू शकता. या व्यवसायासाठी लागणाऱ्या मशीन साठी आपणास जवळपास 50 हजार रुपये खर्च करावे लागतील.
»एक लाख रुपय नफा मिळेल
जर आपण या व्यवसायातून 1 किलोवर 10 रुपये नफ्याचा विचार केला तर आपण दिवसाला 4000 रुपये सहज कमवू शकता. म्हणजेच, जर तुमची कंपनी महिन्यात 25 दिवस काम करत असेल तर तुम्ही एका महिन्यात या व्यवसायातून 1 लाख रुपये कमवू शकता.
Published on: 14 January 2022, 10:54 IST