Others News

जर आपल्यालाही व्यवसाय सुरु करायचा असेल, किंवा आपणास मिळत असलेल्या मानधनात आपण आनंदी नसाल आणि म्हणून एक्स्ट्रा इन्कमसाठी आपणास व्यवसाय सुरु करायचा असेल. कारण काहीही असो पण जर आपणास व्यवसाय सुरु करायचा असेल आणि कुठला व्यवसाय करावा हे सुचत नसेल तर चिंता करू नका आज आम्ही आपणासाठी एक बिझनेस आयडिया घेऊन हजर झालो आहोत,आपण हा व्यवसाय करून वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल करू शकता. तसेच हा व्यवसाय वर्षभर चालतो आणि याची मागणी देखील मोठ्या प्रमाणात बघायला मिळते.

Updated on 24 December, 2021 6:57 PM IST

जर आपल्याकडे स्वतःची जमीन असेल आणि आपण कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल तर हा व्यवसाय आपल्यासाठी एक वरदान ठरू शकतो. आम्ही ज्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत तुम्ही व्यवसाय आहे ash bricks चा अर्थात राखेपासून बनवल्या जाणाऱ्या विटांचा या विटांना सिमेंटच्या विटा म्हणून देखील ओळखले जाते. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया ब्रिक्स मेकिंग बिझनेस विषयी सविस्तर. मित्रांनो ब्रिक्स मेकिंग बिझनेस सुरु करण्यासाठी सर्वप्रथम आपणास शंभर यार्ड जमिनीची आवश्यकता भासेल, जर आपल्याकडे तेवढी जमीन असेल तर हा व्यवसाय आपण  सुरू करू शकता. किंवा आपण भाडेतत्त्वावर जमीन घेऊन देखील हा व्यवसाय सुरू करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपणास कमीत कमी दोन लाख रुपये इन्वेस्ट करावे लागतील. या व्यवसायातून आपण मासिक एक लाख रुपये कमाई करू शकता, जर ब्रिक्सची मागणी अधिक असेल तर आपण या व्यवसायातून वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल करू शकता.

अलीकडे अनेक भागात रिडेव्हलपमेंट ची कामे सुरू आहेत तसेच तसेच छोट्या शहरांचे रूपांतर मोठ्या शहरात केले जात आहे व ग्रामीण भागाचे रूपांतर छोट्या शहरात केले जात आहे आणि या कामात जास्त करून फ्लाय ऍश ब्रिक्स विटांचा वापर केला जात आहे. म्हणून या व्यवसायाला मोठ्या प्रमाणात डिमांड असल्याचे सांगितले जात आहे.

ऑटोमॅटिक मशीन मुळे होतो फायदा

या व्यवसायात जर आपण ऑटोमॅटिक मशीनचा वापर केला तर आपणास मिळणारे उत्पन्न हे अधिक वाढते. असे असले तरी ऑटोमॅटिक मशीन ची किंमत ही खूपच अधिक आहे.

बाजारात या ऑटोमॅटिक मशीन ची किंमत ही जवळपास 10 ते 12 लाख दरम्यान असते. पण जर ऑटोमॅटिक मशीन आपण या व्यवसायात वापरले तर कच्चा माल मिक्सर मध्ये बनवण्यापासून तर विटे तयार करण्यापर्यंत सर्व काम ही मशीन अगदी सहज रित्या करते. असे सांगितले जाते की ऑटोमॅटिक मशीन चा वापर करून एका तासात एक हजार वीट बनवले जाऊ शकते. म्हणजेच आपण या मशिनचा वापर करून एका महिन्यात चार लाख विटांची निर्मिती करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपणास बँकेकडून सहजरीत्या लोन प्राप्त होऊ शकते. तसेच केंद्र सरकार व राज्य सरकार देखील या साठी लोन उपलब्ध करून देते.

English Summary: start ash bricks business by investing two lakh rupees and eran more profit
Published on: 24 December 2021, 06:57 IST