नमस्कार मित्रांनो कृषी जागरण मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत! देशातील अनेक युवक स्वतःचा व्यवसाय करण्याचे स्वप्न पाहत असतात मात्र असे असले तरी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने अनेक युवक व्यवसाय सुरू करू शकत नाही. अनेक युवकांना नोकरी करण्याऐवजी व्यवसाय करने पसंत असते, लाखो रुपयांचा गुलाम बनण्यापेक्षा हजारो रुपयांचा मालक बनने हे अनेकांचे स्वप्न असते. म्हणून आज आम्ही व्यवसाय करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी विशेष माहिती घेऊन आलो आहोत.आज आपण एका व्यवसाय विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत हा व्यवसाय अगदी अल्प भांडवलमध्ये सुरू केला जाऊ शकतो. तसेच या व्यवसायासाठी कुठल्याच कौशल्याची देखील गरज भासत नाही हा व्यवसाय कोणीही सुरू करू शकतो. जर आपण नोकरी करत असाल आणि एक्स्ट्रा इन्कम करायची असेल तरी देखील आपण हा व्यवसाय सुरू करू शकता. हा व्यवसाय सुरू करून लाखो रुपयांची कमाई केली जाऊ शकते. आम्ही ज्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत तो व्यवसाय आहे अमूल फ्रेंचाईजीचा. जर आपणास व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपण अमूल कंपनीची फ्रॅंचायजी विकत घेऊन चांगली मोठी कमाई करू शकता. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या व्यवसाय विषयी.
कशी घेणार अमूलची फ्रॅंचाईजी
जर आपणासही अमूल सोबत काम करायचे असेल किंवा आपणास अमूलचे प्रॉडक्ट विकून चांगली मोठी कमाई करायची असेल, तर आपणास अमूलची फ्रॅंचाईजी विकत घ्यावी लागेल यासाठी आपणास सुमारे दोन लाख रुपये पर्यंत पैसे मोजावे लागतील. या दोन लाख रुपयांमध्ये पंचवीस हजार रुपये नॉन रिफंडेबल असतात हे rs.25000 अमोल कंपनी सिक्युरिटी साठी घेत असते. यात एक लाख रुपयाचे इनोव्हेशन देखील अमूल कडून केले जाते, तसेच 75 हजार रुपयाचे इक्विपमेंट अमूल प्रोव्हाइड करत असते.
अमूल आईस्क्रीम पार्लर खोलण्यासाठी खर्च
आपण अमूल आइस्क्रीम पार्लर ओपन करून देखील चांगली मोठी कमाई करू शकता. यासाठी आपणास सुमारे सहा लाख रुपये मोजावे लागतात या सहा लाख रुपयात चार लाख रुपयाचे इंनोवेशन अमूल द्वारे केली जाते. 50 हजार रुपये अमूल सिक्युरिटी साठी घेत असते.
तसेच अमूल आइस्क्रीम पार्लर साठी सुमारे दीड लाख रुपये चे इक्विपमेंट अमूल कडून दिले जातात. जर आपणास व्यवसाय करायचा असेल तर अमूल आइस्क्रीम पार्लर एक चांगला पर्याय ठरू शकतो. आपण हा व्यवसायाचा लाख रुपयात सुरू करू शकता आणि यातून महिन्याकाठी लाखो रुपयांची कमाई करू शकता.
Published on: 07 January 2022, 10:18 IST