भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रात सर्वात नावाजलेली आणि सर्वात जास्त विक्री होणारी टू व्हीलर म्हणजे स्प्लेंडर प्लस. ही गाडी आपल्या स्टायलिश लूक मुळे आणि दमदार मायलेज मुळे नेहमीच मध्यमवर्गीय लोकांची पहिली पसंत राहिली आहे. जेव्हा पासून देशात पेट्रोलचे भाव आकाशाला गवसणी घालू लागले आहेत तेव्हापासून देशात सर्वत्र चांगल्या मायलेज च्या बाईकची मागणीत वाढ झाली असून स्प्लेंडर प्लस ही बाइक चांगल्या मायलेज साठीच ओळखली जाते. म्हणून कायम एवरग्रीन असणारी ही बाईक मोठ्या प्रमाणात देशात विक्री होत असते. असे असले तरी, अनेक लोकांकडे स्प्लेंडर प्लस बाइक घेण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध नसतो. त्यामुळे गरज असूनही अनेक लोक बाइक घेऊ शकत नाही.
जर आपणासही स्प्लेंडर ही भारतीय बाजारातील सर्वात जास्त विक्री होणारी आणि आपल्या स्टायलिश लूक मुळे आणि दमदार मायलेज मुळे ओळखली जाणारी बाईक परचेस करायची असेल आणि आपल्याकडे एवढी मोठी रक्कम नसेल तर चिंता करू नका आज आम्ही आपल्यासाठी एक स्पेशल ऑफर घेऊन आलो आहोत, या ऑफर अनुसार आपण स्प्लेंडर प्लस बाइकच्या एकूण किंमतीपेक्षा निम्म्या किमतीत विकत घेऊ शकता. तुम्हालाही जाणून घ्यायची आहे ना ही स्पेशल ऑफर चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या विषयी ए टू झेड माहिती.
जाणून घ्या या खास ऑफर विषयी
स्प्लेंडर प्लस बाइक भारतीय बाजारात मोठी नावाजलेली आहे. या गाडीची एक्स शोरूम किंमत 65,610 रुपये ते 71,470 रुपये पर्यंत आहे. जर आपणास ही गाडी नवी कोरी घ्यायचे असेल तर आपणास एवढी मोठी रक्कम खर्च करावी लागेल. पण आपल्या जवळ जर एवढी मोठी रक्कम असेल तर आम्ही सांगतोय त्या ऑफर मध्ये आपण ही बाईक केवळ 33 हजार रुपयात घरी घेऊन जाऊ शकता. परंतु ही बाईक सेकंड हॅन्ड बाईक असणार आहे. आणि या हिरो स्प्लेंडर प्लस गाडीवर आजची ऑफर सेकंड हँड टू व्हीलर खरेदी आणि विक्री करणारी वेबसाइट BIKES24 ने दिली आहे.
ह्या कंपनीने ही बाइक आपल्या साइटवर पोस्ट केली आहे आणि किंमत फक्त 33 हजार रुपये ठेवली आहे. जर आपल्याकडे नवीन गाडी खरेदी करण्यासाठी 72 हजार रुपये नसतील तर आपण या सेकंड हॅन्ड गाडी चा विचार करू शकता. ही गाडी 2014 मध्ये घेतली गेली आहे, जवळपास सात वर्षे गाडीचा वापर झाला आहे. या सात वर्षात ही गाडी 77 हजार किलोमीटरपर्यंत धावली आहे. या ऑफर मधले सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गाडीची ओनरशिप अजूनही फर्स्ट आहे, जर आपण ही गाडी खरेदी करणार असाल तर आपण या गाडीचे दुसरे मालक असणार आहात. या गाडीचे रजिस्ट्रेशन दिल्ली येथले आहे.
बाईक्स ट्वेंटी फोर या कंपनीने गाडी खरेदी करणाऱ्या एक वर्षाची गाडीवर वॉरंटी देखील दिली आहे. यासोबतच कंपनीद्वारे 7दिवसाची मनी बँक गॅरंटी देण्यात आली आहे. म्हणजे जर आपण गाडी खरेदी केली आणि आपणास ही गाडी पसंत नाही पडली तर आपण सात दिवसाच्या आत ही गाडी कंपनीला रिटर्न पाठवू शकता मात्र यासाठी कंपनीने काही नियम व शर्ती लावून दिल्या आहेत त्याला अनुसरूनच गाडी परत केली जाऊ शकते.
Published on: 12 February 2022, 06:32 IST