सर्वप्रथम 1972 मध्ये संयुक्त राष्ट्राकडून पर्यावरण दिवस साजरा करण्याचा आरंभ केला गेला. 1972 मध्ये स्टॉक होम इथे एक पर्यावरण परिषद आयोजित करण्यात आली होती. हीच पर्यावरण परिषद जगातील पहिली पर्यावरण परिषद म्हणून ओळखली जाते, ज्यामध्ये तब्बल 120 देशाने आपला सहभाग नोंदवला होता यामध्ये भारताच्या त्यावेळच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी हजर होत्या. तेव्हा पासून दरवर्षी 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो.हा दिवस साजरा करण्याचा उद्देश असा की या दिवशी पर्यावरण विषयी जनसामान्य लोकात जगभरामध्ये जागृती निर्माण करणे होय,सोबतच संपूर्ण जगाला पर्यावरणाचे महत्व पटवून देऊन ,पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी जगभरात प्रबोधन करण्यासाठी आजचा दिवस हा संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो.
या वर्षी 5 जून 2022 थीम only one Earth( केवळ एक पृथ्वी आहे ) आपल्याला माहित आहे कि सूर्यमालेत एकूण आठ ग्रह आहेत,परंतु यामध्ये पृथ्वी असा एकमेव ग्रह आहे की ज्या ग्रहावर मानव प्राणी व वनस्पती ह्या आपल्या जीवन चक्र पूर्ण करू शकतात.आज मानव ने विज्ञान व तंत्रज्ञानाच्या साह्याने मंगळ ग्रहावर सुद्धा जाऊन आला अजून सुद्धा बुध आणि शुक्र या ग्रहावर जाण्यासाठीच्या मोहिमा आखत आहे. परंतु पृथ्वी या ग्रहा सारखे बाकी ग्रहावर जीवनमान पूर्ण करता येईल का हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीतच आहे ? सध्या मानव ज्या पृथ्वी ग्रहावर राहतो हा ग्रह जपला जाणे गरजेचे आहे . या वर्षीची थीम केवळ एक पृथ्वी आहे आपण सर्व जिथे राहतो ती पृथ्वी एक आहे म्हणून सर्वांनी मिळून या पृथ्वीवरील पर्यावरणाचे संतुलन राखायला हवे पर्यावरणाची काळजी घेत सद्भावनेने आपली पृथ्वी आणि जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या आजूबाजूचे पर्यावरण सुरक्षित ठेवायला हवे.
जगभरामध्ये वेगवेगळ्या देशात पर्यावरण संरक्षणासाठी वेगवेगळे कायदे, धोरण आहेत. तसेच सर्व देशांना सोबत घेऊन जागतिक स्तरावर सुद्धा पर्यावरण संरक्षणाविषयी वेगवेगळे , कायदे, धोरणं ची अंमलबजावणी केली आहे.भारत सुद्धा पर्यावरण संरक्षणाविषयी कटिबद्ध आहे.भारत हा जगातील असा देश आहे ज्यांनी पर्यावरण संरक्षणाविषयी ची कटिबद्धता आपल्या राज्यघटनेत सुद्धा दिली आहे. पर्यावरण संरक्षणासाठी भारत सरकार अतिशय गांभीर्याने लक्ष देत आहे. यासाठी पर्यावरण संरक्षण करण्यासाठी सरकारने काही कायदे देखील बनवले आहेत. भारतात पर्यावरण संरक्षण विषयी कायदा सगळ्यात पहिले 1986 मध्ये लागू करण्यात आला.पर्यावरण व कृषी क्षेत्राचा खूप जवळचा संबंध आहे.
Published on: 05 June 2022, 11:41 IST