Others News

डेबिट आणि क्रेडिट कार्ड द्वारे केल्या जाणाऱ्या पेमेंटचा नियमांमध्ये एक जानेवारीपासून मोठा बदल करण्यात येणार आहे. ग्राहकांचा डेटा अधिक सुरक्षित राहावा यासाठी आरबीआयनेनवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Updated on 23 December, 2021 10:06 AM IST

डेबिट आणि क्रेडिट कार्ड द्वारे केल्या जाणाऱ्या पेमेंटचा नियमांमध्ये एक जानेवारीपासून मोठा बदल करण्यात येणार आहे. ग्राहकांचा डेटा अधिक सुरक्षित राहावा यासाठी आरबीआय ने नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

पुढील वर्षापासून डेबिट अथवा क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करण्यासाठी तुमच्या कार्डलाएक टोकन नंबर देण्यात येईल. त्यामुळे ग्राहकांना नवीन वर्षापासून त्याच टोकन द्वारे पेमेंट करता येणार आहे.

काय आहे ही टोकन पद्धत?

  आता छोट्या-मोठ्या खरेदी असो की कुठली व्यवहार यासाठी डिजिटल पद्धतीने व्यवहार केले जातात.यासाठी डेबिट वा क्रेडिट कार्डचा वापर बहुतांशी केला जातो. या पार्श्वभूमीवर आपल्या कार्डचा डेटा कोणत्याही कंपनी किंवा व्यापाऱ्याला देतो.

 हे संबंधित व्यापारी किंवा कंपनी डेटा संग्रहित करते. त्यामुळे डेटा चोरीची शक्यता वाढते. अशा प्रकारची फसवणूक होऊ नये यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक नवीन नियम आणला आहे.ज्याद्वारे ते कोणत्याही क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा टोकन क्रमांक देईल,ज्याला टोकनायझेशनअसं म्हटले जाते.

या नवीन नियमानुसार 1 जानेवारी 2022 पासून कोणतीहीकंपनी कार्ड ची माहिती साठवू शकणार नाही. 

जसे की कार्ड नंबर, एक्सपायरी डेट किंवा सीव्हीव्हीसाठवू शकणार नाही. आरबीआयने सर्व कंपन्यांना ग्राहकांचा साठवलेला डेटा  अगोदर डिलीट करण्यास सांगितले आहे. जेणेकरून ऑनलाईन व्यवहारांच्या सुरक्षेसाठी वाढवता येईल. त्यामुळे या पार्श्वभूमीवर नवीन वर्षापासून तुम्हाला कोणतेही तपशील न देता पेमेंट करण्यासाठी टोकनायझेशनचा पर्याय निवडायचालागेल.(संदर्भ-zee24तास)

English Summary: some rule chane in make payment by credit and debit card from 1 january 2022
Published on: 23 December 2021, 10:06 IST