आजपासून सात दिवसांनी नवीन महिना सुरू होत असून येणाऱ्या एक ऑगस्ट पासून पैशांच्या संबंधित काही नियमांमध्ये बदल होणार असून त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. एक ऑगस्ट असून बँक ऑफ बडोदाचे चेक पेमेंटचे नियम बदलणार आहेत.
त्यासोबतच एलपीजी सिलिंडरचा दर महिन्याच्या एक तारखेला ठरवल्या जातात. अजून काही नियमांमध्ये बदल होऊ शकतात.
बँक ऑफ बडोदा चेक पेमेंट चे नियम बदलणार
बँक ऑफ बडोदा चे चेक पेमेंट चे नियम एक ऑगस्टपासून बदलणार असून मध्यवर्ती बँक रिझर्व बॅंकेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करून, सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा चे पेमेंट नियम बदलले आहेत.
नक्की वाचा:एका वर्षात 78 वेळा पेट्रोलचे दर वाढवले, आपचा खासदार संसदेत थेट मोदींना भिडला..
या बँकेने आपल्या ग्राहकांना सांगितले आहे की, एक ऑगस्ट पासून पाच लाख किंवा त्याहून अधिक रकमेचे चेक पेमेंट साठी सकारात्मक वेतन प्रणाली अनिवार्य करण्यात आली असून त्याशिवाय धनादेश अदा होणार नाही.
सकारात्मक वेतन प्रणाली अंतर्गत चेक जारी करणाऱ्याला चेकच्या संबंधित माहिती द्यावी लागेल. ही माहिती एसएमएस, मोबाईल ॲप किंवा इंटरनेट बँकिंग तसेच एटीएम द्वारे दिली जाऊ शकते. यामध्ये चेक जारी करणाऱ्याला चेक ची तारीख, पैसे देणाऱ्याचे नाव, रक्कम तसेच चेक नंबर इत्यादी सर्व डिटेल्स माहिती द्यावी लागेल.
ऑगस्टमध्ये 18 दिवस बँक बंद
ऑगस्ट महिन्यामध्ये सण आणि काही सुट्ट्यांमुळे बँक अठरा दिवस बंद राहणार आहेत. रक्षाबंधन, गणेश चतुर्थी, स्वातंत्र्यदिन तसेच जन्माष्टमी यासारख्या सण आणि महत्त्वाच्या दिवसांमध्ये ऑगस्टमध्ये सुट्ट्या जास्त असतात.
15 ऑगस्टला लॉंग वीकेंड येणार आहे. रिझर्व बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या सुट्टीच्या यादीनुसार, राज्यानुसार सुट्ट्यांची यादी वेगवेगळे आहे. हे सण किंवा सुट्ट्या खास प्रसंगी अवलंबून असतात. या सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू नाहीत. त्याच्या राज्यांमध्ये होणारे सण किंवा दिवसांवर ते अवलंबून असतात.
गॅस सिलिंडरच्या किमतीत होऊ शकतात बदल
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडर च्या किमती निश्चित केल्या जातात. एक ऑगस्ट रोजी सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या गॅस सिलेंडरचे दर ठरवतील. यावेळी कंपन्या दर वाढवू शकतात अशी शक्यता आहे.
नक्की वाचा:१४ चा उतारा बसला आणि १० चा बसला तरी समान बाजारभाव का? कष्टकरी ऊस उत्पादकांवर होतोय अन्याय
Published on: 26 July 2022, 06:46 IST