काल एक आक्टोंबर पासून बँकेचे काही नाही मध्ये बदल करण्यात आला आहे त्यामुळे या बदललेल्या नियमा विषयी माहिती असणे फार गरजेचे आहे. त्यामुळे नुकसान होऊ शकते. या लेखात आपण त्यांनी कोणकोणत्या नियमांमध्ये बदल केला ते पाहू.
ऑटो डेबिट चे नियम बदलले
एक ऑक्टोबरपासून रिझर्व बँकेने क्रेडिट आणि डेबिट कार्ड वरील अल्टो डेबिट साठी चे नवीन नियम लागू केलेत. या नियमानुसार 1 ऑक्टोबर 2021 पासून बँकेला कोणत्याही ऑटो डेबिट पेमेंटसाठी ग्राहकांना चोवीस तास अगोदर पूर्वसूचना द्यावी लागेल. ग्राहकांच्या खात्यातून पैसे कन्फर्म झाल्यावर पैसे डेबिट केले जातील. बँकेद्वारे ही यादी सूचना ग्राहकांना एसएमएस किंवा ई-मेल द्वारे पाठवली जाईल. ग्राहकाने मंजुरी दिल्याशिवाय ऑटो डेबिट करता येणार नाही. सध्याच्या काळात अनेक लोक मोबाईल, पाणी बिल, विज बिल इत्यादी सर्व बिलांचे पेमेंट ऑटोमोड पेमेंट मोड पद्धतीनेच करून टाकतात. याचा अर्थ असा की हे डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म अथवा बँक ग्राहकांकडून एकदा परवानगी घेतल्यानंतर प्रत्येक महिनेला कसल्याही परवानगीशिवाय त्यांच्या खात्यातून पैसे कापतात. या पद्धतीमुळे ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता अधिक आहे. वाढत्या फसवणुकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी म्हणून हे नियम बदलण्यात येत आहेत.
काही बँकांच्या आयएफएससी आणि एमआयसीआर कोड मध्ये बद्दल
एक ऑक्टोबर पासून युनायटेड बँक ऑफ इंडिया, ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स आणि अलाहाबाद बँक सचिन बँकांचे चेकबुक आणि एम आय सी आर कोड आपोआप अवैध ठरतील. कारण या बँकांचे विलीनीकरण इतर बँकांमध्ये झाले आहे. त्यामुळे या बँकांचा आयएफएससी आणि एम आय सी आर कोड मध्ये बदल झाला आहे. त्यामुळे या बँकांचे एक आक्टोबर 2021 पासून बँकिंग प्रणाली जुने चेक बुक नाकारेल.
पेन्शनच्या नियमांमध्ये बदल
आता देशातील सर्व वृद्ध निवृत्तीवेतनधारक ज्यांचे वय 80 वर्ष किंवा त्याहून अधिक आहे ते देशातील सर्व मुख्य पोस्ट ऑफिस मध्ये लाइफ सर्टिफिकेट सादर करू शकतात. वृद्ध निवृत्तीवेतनधारकांना मुख्य पोस्ट ऑफिसच्या जीवन प्रदान केंद्रात डिजिटल लाइफ सर्टिफिकेटसादर करावे लागतील. या कामासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत ज्येष्ठांना वेळ देण्यात आली आहे. वृद्धांसाठी लाइफ सर्टिफिकेट सादर करण्याचे काम ऑक्टोबर पासून पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून सुरु होईल. ( संदर्भ-abpमाझा)
Published on: 02 October 2021, 12:11 IST