Others News

आजकल शेतकरी बांधव शेतीमधील उत्पन्न वाढवण्यासाठी आपल्या शेतात वेगवेगळ्या खतांचा आणि रासायनिक खतांचा वापर करत असतात.राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत मृद आरोग्य पत्रिका या मध्ये रासायनिक खतांचा वापर कमी करून रानातील माती तपासून घ्यावी.

Updated on 28 June, 2021 6:34 PM IST

आजकल शेतकरी बांधव शेतीमधील उत्पन्न वाढवण्यासाठी आपल्या शेतात वेगवेगळ्या खतांचा आणि रासायनिक खतांचा वापर करत असतात.राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत मृद आरोग्य पत्रिका या  मध्ये रासायनिक  खतांचा वापर  कमी  करून  रानातील  माती तपासून घ्यावी.

तसेच अन्नद्रव्यंच्या कमतरतेनुसार खतांच्या संतुलित आणि परिणामी वापरास प्रतिसाद देणे.शेती मधील मूलद्रव्ये वाढवण्यासाठी शेतामध्ये जैविक खते, सेंद्रिय खते, गांडूळ खत, निंबोळी खत आणि शेणखत या प्रकारच्या खतांना वापरण्यास प्रोत्साहन देणे.

योजनेची मुख्य अट:-

  • या योजनेला धारक शेतकऱ्याकडे लागवडी योग्य शेतजमीन असणे आवश्यक आहे

महत्वाची कागदपत्र:

  • जमिनीचा 7/12 खाते उतारा

हेही वाचा:इंडियन कोस्ट गार्ड मध्ये 50 जागांवर भरती, अर्ज कसा करावा?

लाभाचे स्वरूप:- मृदा आरोग्य पत्रिका

योजनेतील मुख्य आणि महत्वाचे घटक:-

  • जमिनीचे आरोग्य पत्रिका वितरण:- जमिनीच्या सुपिकतेची निर्देश पत्रिका तसेच अन्नद्रव्य वापराच्या शिफारस व आरोग्य पत्रिकेचे विवरण
  • मृद विश्लेषण प्रशिक्षण:- इंडियन ऍग्री रिसर्च सेंटर यांच्या सहभागातून 20 मृद विश्लेषण गटाकरिता 7 दिवसांचे परिचय प्रशिक्षणआयोजन करणे.
  • अन्नद्रव्य वापरास आर्थिक साहाय्य पुरवणे:- शेतीमधील अन्नद्रवेची कमतरता संतुलित ठेवणे, तसेच पीक पद्धत संतुलित प्रमाणात अन्नद्रव्य व्यवस्थापणास चालना देणे.

अभियानाचे व्यवस्थापक:- या संपूर्ण  अभियान व्यवस्थेसाठी आणि नियोजनासाठी  कृषी आयुक्तालय पातळीवरील  वरिष्ठ संगणक प्रोग्रामर, तांत्रिक सहाय्यक ,डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि शिपाई यांकडे व्यवस्थापनाचे सर्व काम असेल.या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व जिल्ह्यातील जिल्हा अधिक्षयक कार्यालये आणि जिल्हा मृद परीक्षण कार्यालय येथे संपर्क साधावा.

English Summary: Soil Health Scheme under National Sustainable Agriculture Mission
Published on: 28 June 2021, 06:33 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)