Others News

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स आणि स्मार्टफोन निर्मिती क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण आणि अग्रगण्य कंपनी आहे. अनेक प्रकारचे आकर्षक गॅझेट या कंपनीने तयार केले आहेत. जर आपण मोबाईलच्या बाबतीत विचार केला तर अनेक चांगले वैशिष्ट्ये आणि ग्राहकांना परवडतील अशा किमतींमध्ये सॅमसंगने अनेक स्मार्टफोन देखील लॉन्च केले आहेत.

Updated on 27 October, 2022 8:46 PM IST

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स आणि स्मार्टफोन निर्मिती क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण आणि अग्रगण्य कंपनी आहे. अनेक प्रकारचे आकर्षक गॅझेट या कंपनीने तयार केले आहेत. जर आपण मोबाईलच्या बाबतीत विचार केला तर अनेक चांगले वैशिष्ट्ये आणि ग्राहकांना परवडतील अशा किमतींमध्ये सॅमसंगने अनेक स्मार्टफोन देखील लॉन्च केले आहेत.

याच पार्श्वभूमीवर सॅमसंग कंपनीने त्यांच्या ए सिरीजच्या एक बजेट स्मार्टफोन लॉन्च केला असून त्याला 'सॅमसंग गॅलेक्सी A04e' हे नाव दिले आहे. या लेखात आपण या स्मार्टफोनचे वैशिष्ट्ये  पाहू.

नक्की वाचा:Mobile News: आकर्षक वैशिष्ट्ये आणि परवडणाऱ्या किमतीत हवा असेल स्मार्टफोन तर 'ओप्पो A17K' ठरेल फायद्याचा, इतकी आहे किंमत

' सॅमसंग गॅलेक्सी A04e' स्मार्टफोनचे वैशिष्ट्ये

 या फोनमध्ये मीडियाटेक हिलिओ G35 प्रोसेसर या फोनमध्ये असू शकतो. या फोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. जो इन्फिनिटी-व्ही नॉच सह येतो. या फोनमध्ये ऑक्टा कोअर प्रोसेसर असणार आहे.

याबाबत कंपनीने अजून कुठल्याही प्रकारचे नाव जाहीर केलेले नाही. या फोनमध्ये  डुएल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून त्याची प्रायमरी लेन्स 13 मेगापिक्सलचे असून सेकंडरी लेन्स  दोन मेगापिक्सलची आहे. तसेच त्या फोनच्या मागच्या बाजूला एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे व फ्रंट मध्ये पाच मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. जर आपण या मोबाईलची बॅटरीची क्षमता पाहिली तर ती 5000mAh इतकी आहे.

नक्की वाचा:Mobile News: दिवाळीच्या मुहूर्तावर सॅमसंगने लाँच केला कमी किमतीतला बेस्ट स्मार्टफोन, वाचा या फोनची वैशिष्ट्ये आणि किंमत

हा स्मार्टफोन तीन रंगांमध्ये उपलब्ध असून ते म्हणजे ब्लॅक, ऑरेंज कॉपर आणि लाईट ब्लू असे तीन रंग आहेत. 188 ग्रॅम वजन असलेल्या या स्मार्टफोनमध्ये मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट देखील देण्यात आला आहे व साडेतीन मीमि ऑडिओ जॅकपॉर्ट आणि डुएल सिम सपोर्ट देखील आहे.

हा फोन तुम्हाला तीन जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज, चार जीबी रॅम तसेच 64 जीबी स्टोरेज आणि चार जीबी रॅम 128 जीबी स्टोरेज मध्ये उपलब्ध आहे.

 या स्मार्टफोनची किंमत

जर आपण या स्मार्टफोनच्या किमती बद्दल विचार केला तर कंपनीने अजून या फोनची किंमत जाहीर केलेली नसून सॅमसंगच्या याच श्रेणीतील A04s स्मार्टफोनची किंमत 13 हजार 499 रुपये आहे. यावरून एक अंदाज लावला जात आहे की, या स्मार्टफोनची किंमत देखील जवळपास इतकेच असू शकते.

नक्की वाचा:EPF ट्रान्सफर प्रक्रिया आणखी झाली सोपी, आता तुम्हाला फॉर्म-13 भरावा लागणार नाही; जाणून घ्या प्रक्रिया...

English Summary: smasung launch A04e in so many attractive features and affordable price
Published on: 27 October 2022, 08:46 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)