विवो या मोबाईल क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ने सोमवारी भारतात आपला vivo Y33s हा स्मार्टफोन लॉन्च केला. हा अँड्रॉइड फोन अनेक वैशिष्ट्य युक्त आहे. या लेखात आपण या फोनची वैशिष्ट्ये जाणून घेऊ.
Vivo Y33s स्मार्ट फोनची वैशिष्ट्ये
- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा फोन दोन रंग आणि एका वेरियंट मध्ये उपलब्ध आहे.
- या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये f/1.8 लेन्स सह पन्नास मेगापिक्सलचा प्राथमिक सेंसर, f/2.4अपचेरसहमेगापिक्सलचा मॅक्रो शूटर आणि f/2.4 लेन्स सह 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर समाविष्ट आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी फोनच्या समोर f/2.0अपचेरसहा सोळा मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
- हा स्मार्टफोन ड्युअल सिम फोन आहे.
- या स्मार्टफोनमध्ये Funtouch OS 11.1 Android 11 ऑपरेटिंग सिस्टम वर आहे.
- या स्मार्ट फोनचा डिस्प्ले हा फुल एचडी असून तो 6.58 इंचाचा आहे.
तसेच एलसीडी डिस्प्ले 1080×2408 पिक्सेल आहे.
- यामध्येMedia TekHelioG80 SoC प्रोसेसर आहे.
- या फोनचाचाविचार केला तर या फोनची रॅम आठ जीबी आहे आणि 128 जीबी स्टोरेज आहे. ते मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येते.
- कनेक्टिविटी साठी या फोनमध्ये ड्युअल बँड वाय-फाय, 4 जी, ब्लूटूथ व्ही 5, एन एफ सी, जीपीएस आणि यूएसबी टाइप सीपोर्ट आहे.
- या स्मार्टफोनच्या बाजूला फिंगरप्रिंट स्कॅनर सह फेस अनलॉक चे वैशिष्ट्य देण्यात आले आहे.
- या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी 18W फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करते.
- हा फोन 164.26×76.08×8 मी मी आणि वजन 182 ग्राम आहे.
या फोनची किंमत भारतीय बाजारपेठेत 17 हजार 990 रुपये आहे. हा फोन तुम्ही फ्लिपकार्ट, बजाज फिन्सर्व,टाटा क्लिक, पेटीएम,ईएमआय स्टोअर तसेच सर्व पार्टनर रिटेल स्टोअर्स वरुन खरेदी करू शकता. जर तुम्ही हा फोन एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट किंवा डेबिट कार्डवर खरेदी केला तर यावर कंपनी एक हजार 500 रुपयांचा फ्लॅट कॅशबॅक आहे.
Published on: 24 August 2021, 08:28 IST