एलपीजी गॅस सिलेंडर आता सहजपणे उपलब्ध होणार आहेत. याबाबतीत केंद्र सरकारने म्हटले आहे की आता रेशन दुकानांमध्ये छोटे एलपीजी गॅस सिलिंडरची विक्री करण्यास परवानगी देण्याचा विचार केला जात आहे.
वृत्तानुसार या मुद्द्यावर केंद्र सरकारची राज्य सरकारनं बरोबर व्हीसी माध्यमातून बैठक झाली. या बैठकीचे अध्यक्ष पद खाद्य सचिव सुधांशु पांडे यांच्याकडे होते. तसेच सोबत इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय,पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने प्रतिनिधी देखील उपस्थित होते.
सरकारच्या या प्रस्तावाला पेट्रोलियम कंपन्यांच्या प्रतिनिधींनी देखील पाठिंबा दर्शवला आहे. त्याबाबतीत पेट्रोलियम कंपन्यांनी म्हटले आहे की,केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना यासाठी पाठिंबा दिला जाईल.
या बैठकीत या संदर्भात सांगण्यात आले की खाद्य सचिवांनी एफपीएसच्या आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी ठोस पावले उचलणे वर भर दिला. राज्य सरकार यांनी म्हटले की कॉमन सर्विस सेंटर बरोबर सहकार्य करून एफ पी एस चे महत्व वाढेल. तसेच स्थानिक गरजा लक्षात घेऊन त्याचा आढावा घेण्यासाठी सीएससी बरोबर ताळमेळ साधला जाईल.
सूत्रांकडून समोर आलेल्या माहितीनुसार एलपीजी च्या बाबतीत कमी किमतीच्या विक्रीमुळे होणारा तोटा प्रति सिलेंडर 100 रुपयांवर पोहोचला आहे.
त्यामुळे त्याच्या किमती वाढू शकतात. आंतरराष्ट्रीय किमतींमध्ये वाढ झाल्याने एलपीजीच्या विक्रीतील तोटा शंभर रुपये प्रति सिलेंडर वर पोहोचला आहे. एलपीजीचे दर सहा ऑक्टोबर रोजी प्रति सिलेंडर पंधरा रुपये वाढवले होते. जर जुलै पासून विचार केला तर एकूण दर 90 रुपये प्रति 14.2 किलो ग्रॅम सिलेंडर वर वाढले आहेत.
( संदर्भ- टाइम्स नाऊ न्यूज मराठी)
Published on: 29 October 2021, 08:41 IST