Others News

आजच्या काळात नमकिन पदार्थांना खूप मागणी आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत नमकीन खाण्याचा छंद हा प्रत्येकाला जडला आहे, त्यामुळे नमकीन बनवण्याचा व्यवसाय सुरू केलात, तर निश्चितचं यातून चांगला बक्कळ पैसा कमवता येणार आहे.

Updated on 29 May, 2022 12:22 AM IST

आजच्या काळात नमकिन पदार्थांना खूप मागणी आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत नमकीन खाण्याचा छंद हा प्रत्येकाला जडला आहे, त्यामुळे नमकीन बनवण्याचा व्यवसाय सुरू केलात, तर निश्चितचं यातून चांगला बक्कळ पैसा कमवता येणार आहे.

चला तर मग जाणून घेऊया नमकीनचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किती खर्च येतो, तसेच त्यात कोणते पदार्थ आवश्यक आहेत. चला तर मग जाणुन घेऊया याविषयी सविस्तर.

नमकिनचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर सर्वप्रथम तुमच्याकडे जमिनीची चांगली व्यवस्था असावी. यानंतर नमकीन तयार करण्यासाठी नमकीन मशीन असावे. नमकीन बनवण्याच्या मशिनची किंमत सुमारे 40 ते 90 हजार आहे, त्यामुळे यानुसार तुम्ही नमकीन मशीनने व्यवसाय सुरू केल्यास 2 ते 6 लाख रुपयांपर्यंत खर्च येईल.

जमिनीची गरज

नमकीन व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जमीन लागेल. जर तुम्हाला छोट्या स्तरातून व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही तुमच्या घरातील छोट्या खोलीतूनही सुरुवात करू शकता आणि जर तुम्ही मोठ्या स्तरापासून सुरुवात केली तर त्यासाठी तुम्हाला बाहेर सुमारे 300 ते 1000 चौरस फूट जागा लागेल.

कर्मचारी आणि वीजेची गरज भासेल 

नमकीनच्या व्यवसायासाठी कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. या व्यवसायासाठी 2 ते 3 कर्मचारी आवश्यक आहेत. दुसरीकडे, नमकीन व्यवसायात नमकीन बनवण्यासाठी, मशीन चालविण्यासाठी वीज लागेल, ज्यामध्ये तुम्हाला 5-8 किलोवॅटचे कनेक्शन घ्यावे लागेल.

कच्चा माल आणि यंत्रे कोठे खरेदी करायची

या व्यवसायासाठी नमकीन बनवण्यासाठी कच्चा माल लागणार आहे. बेसन, मोहरीचे तेल, मिरची, मसाले इत्यादी कच्चा माल, जो तुम्ही जवळपासच्या कोणत्याही बाजारातून खरेदी करू शकता. दुसरीकडे, जर आपण मशीन खरेदीबद्दल बोललो, तर आजकाल मोठ्या कंपन्या नमकीन बनवण्याची अनेक मशीन तयार करत आहेत. जे तुम्ही बाजारातून सहज खरेदी करू शकता.

व्यवसायासाठी आवश्यक लायसन्स

जर तुम्ही छोट्या प्रमाणावर व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला नोंदणी आणि परवान्याची गरज भासणार नाही. जर तुम्ही मोठ्या प्रमाणावर व्यवसाय सुरू करत असाल तर त्यासाठी तुम्हाला नोंदणी आणि परवाना घ्यावा लागेल. यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या काही गोष्टी फॉलो कराव्या लागतील.

»नमकीनच्या व्यवसायासाठी, प्रथम तुम्हाला एमएसएमई अंतर्गत नोंदणी करावी लागेल.

»यानंतर, नमकिन पदार्थ बाजारात विकण्यासाठी FSSAI फूड-लायसन्स घ्यावा लागेल.

»यानंतर तुम्हाला व्यवसायासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून एनओसी घ्यावी लागेल आणि कारखान्याचा परवानाही घ्यावा लागेल.

»या व्यवसायासाठी GST नोंदणी देखील करावी लागेल.

जर तुम्हाला नमकीन उत्पादन तुमच्या स्वतःच्या ब्रँड नावाने बाजारात विकायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला ट्रेडमार्क नोंदणी देखील करावी लागेल.

English Summary: Small Business Idea: Start this business in the village and earn millions; Read on
Published on: 29 May 2022, 12:22 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)