भारतात गॅस कनेक्शन मिळवण्यासाठी आधी लांब-लचक कागदपत्रांची पूर्तता करावी लागत असे आणि मग कुठे गॅस कनेक्शन मिळत असे पण आता गेले ते दिवस! भारतात आता डिजिटल व ऑनलाईनचा जमाना आला आहे आता कुठलीही गोष्ट फक्त आधार कार्ड दाखवून प्राप्त करता येत आहे. नवीन शहरात वास्तव्यास गेलेल्या व्यक्तींसाठी किंवा नवीन गॅस कनेक्शन प्राप्त करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी एक कामाची बातमी समोर आली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ची गॅस कम्पनी इंडेन ने नुकतीच एक माहिती जाहीर केली आहे.
इंडेन ने आपल्या ऑफिसिअल स्टेटमेंट मध्ये म्हटले आहे की, आता कोनताही भारतीय नागरिक केवळ आधार कार्ड दाखवून ताबडतोब गॅस कनेक्शन मिळवू शकतो. गॅस कनेक्शन मिळवण्यासाठी आता आधार कार्डच्या डिटेल्स व्यतिरिक्त अन्य कुठलेही डॉक्युमेंटची व माहितीची गरज भासणार नाही आहे. त्यामुळे नव्याने गॅस कनेक्शन घेणाऱ्या व्यक्तींसाठी हे खुप सोयीचे होणार आहे.
नवीन शहरात कामासाठी गेलेल्या किंवा वास्तव्यास गेलेल्या व्यक्तींसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. गॅस कनेक्शन घेण्यासाठी अनेक दस्ताऐवज जमा करावे लागतात विशेष म्हणजे पत्त्याचा पुरावा द्यावा लागत असे आणि त्यामुळे अनेक नव्याने वास्तव्यास गेलेल्या व्यक्तींना गँस कनेक्शन मिळवणे मोठे मुश्किलीचे जात असे आणि त्यामुळे ते बाहेरून ब्लॅक मध्ये सिलेंडरची खरेदी करत असे जे की पूर्णतः चुकीचे होते आणि शिवाय त्यासाठी त्यांना जास्तीचे पैसे देखील मोजावे लागत असे पण आता इंडेन ही घोषणा करून त्या प्रत्येक व्यक्तींसाठी सोयीचे काम करून दिले आहे. आता भारतात गॅस कनेक्शन मिळवणे हे खुप सोयीचे झाले आहे आणि काही क्षणात फक्त आधार कार्ड दाखवून आता गँस कनेक्शन मिळवता येणार आहे.
इंडेन ने आपल्या ट्विटर वरून दिली माहिती
इंडेन ने आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून ही माहिती आपल्या ग्राहकांना दिली. इंडेन ने आपल्या विधानात म्हटले की, कोणतीही व्यक्ती आधार दाखवून नवीन एलपीजी कनेक्शन मिळवू शकते. ज्या व्यक्तीला गँस कनेक्शन हवं आहे त्या व्यक्तीला सुरुवातीला विनाअनुदानित कनेक्शन दिले जाईल म्हणजे त्या व्यक्तीला सबसिडीचा लाभ मिळणार नाही. ग्राहक जेव्हा पत्ता पुरावा सादर करेल तेव्हा त्याला सिलिंडरवरील अनुदानाचा लाभही घेता येणार आहे. म्हणजेच तुम्ही जर आधार कार्ड आणि पत्त्याच्या पुरावा दाखवला तर तुम्हाला सरकारी अनुदानाचा म्हणजेच सबसिडीचा लाभ मिळेल पण जर एखाद्या ग्राहकाला ताबडतोब गॅस कनेक्शन हवे असेल आणि त्याच्याकडे पत्त्याचा पुरावा नसेल, तर तो लगेच आधार देऊन नवीन गँस कनेक्शन मिळवू शकतो.
असे मिळवा गॅस कनेक्शन
»सर्व्यात आधी आपल्याला आपल्या जवळच्या इंडेनच्या गॅस एजन्सी ला भेट द्यावी लागेल. »त्यानंतर आपल्याला गॅस कनेक्शन मिळवण्यासाठी अर्ज करावा लागेल.
»त्यामध्ये तुम्हाला आधार कार्डची डिटेल्स भरावी लागेल आणि आधार ची झेरॉक्स द्यावी लागेल.
»घरच्या पत्त्यासाठी सेल्फ डेक्लेरशन फॉर्म भरावा लागेल
»एवढी माहिती दिल्यानंतर आपल्याला ताबडतोब गँस कनेक्शन दिले जाईल
»फक्त आधार कार्ड जमा करून आपल्याला सबसिडीचा लाभ मिळणार नाही जेव्हा तुम्ही आपला पत्त्याचा पुरावा सादर कराल तेव्हाच आपल्याला गॅस सबसिडी मिळेल.
Published on: 19 October 2021, 06:57 IST