कोरूना महामारी च्या काळामध्ये एक उद्योग असा राहिला जाने 80 वर्षांपासून चे जुने रेकॉर्ड मोडीत काढले. जर तुम्हालाही व्यवसायिक जगात प्रवेश करायचा असेल तर हा उद्योगाविषयी विचार करू शकता. तो उद्योग आहे बिस्कीट उद्योग. ज्याची मागणी केव्हाही असते. कोरोना लॉकडाऊन च्या काळामध्ये सगळ्या धंद्यांमध्ये मंदी होती. यावेळेस पार्ले जी बिस्कीट च्या विक्रीमध्ये जवळजवळ 82 सालामध्ये झाली नव्हती एवढी वाढ झाली. यामुळे बेकरी प्रॉडक्ट बनवण्याचा युनिट सेटप करणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
बिस्किट उद्योगा विषयी माहिती
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार मदत देखील देते. सरकारच्या मुद्रा योजने द्वारे या उद्योगासाठी सहजतेने कर्ज सुविधा उपलब्ध होते. यासाठी तुम्हाला संबंधित प्लांट सुरू करण्यासाठी जागा, लो कॅपॅसिटी मशिनरी आणि रॉ मटेरियल यांच्यामध्ये गुंतवणूक करायला लागते. जर तुम्ही हा व्यवसाय सुरु करायचे ठरवले तर मुद्रा योजनेद्वारे तुम्हाला फक्त एक लाख रुपये गुंतवणूक करावी लागते. एकूण खर्चाच्या 80 टक्के मदत ही सरकारकडून दिली जाते.यासाठी या उद्योगासाठी चा प्रोजेक्ट रिपोर्ट स्वतः सरकारने तयार केला आहे. या उद्योगाच्या माध्यमातून तुम्ही महिन्याला 40 हजार रुपये आरामात कमवू शकता.
बिस्किट उद्योग प्लांट चा खर्च
बिस्किट उद्योग प्लांटसेटप करण्यासाठी एकूण खर्च 5.36लाख रुपये येतो. यासाठी तुमच्या जवळ एक लाख रुपये असले तर मुद्रा योजने द्वारे बाकीचे पैसे उपलब्ध होतात. मुद्रा योजने द्वारे निवड झाल्यानंतर बँक टर्म लोन च्या स्वरूपात 2.87 लाख रुपये आणि वर्किंग कॅपिटल लोन 1.49 लाख रुपये देते.
प्रोजेक्ट रिपोर्ट नुसार 500 चौरस फूट स्वतःची जागा असणे आवश्यक आहे. जर तुमची स्वतःची जागा नसेल तर भाड्याने जागा घेऊन ती प्रोजेक्ट फाईल मध्ये दाखवावी लागते.5.36 लाख रुपयाच्या प्रोजेक्टमधून वर्षाचा उत्पादन आणि त्याची विक्री याचा अंदाज खालील प्रमाणे आपण लावू शकतो.
- प्रोडक्शनकॉस्ट-14.26 लाख रुपये
- टर्न ओव्हर -20.38लाख रुपये
- ग्रॉस प्रॉफिट -6.12 लाख रुपये
- कर्जावरील व्याज-50 हजार रुपये
- इन्कम टॅक्स -13 ते पंधरा हजार रुपये
- अन्य खर्च- 70 ते 75 हजार रुपये
- नेट प्रॉफिट-4.60 लाख रुपये
- मासिक उत्पन्न – पस्तीस ते चाळीस हजार
मुद्रा योजने द्वारे करू शकता अर्ज
या उद्योगासाठी भांडवल साठी प्रधानमंत्री मुद्रा योजना द्वारे कोणत्याही बँकेत तुम्ही अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागतो. त्यामध्ये तुमचे नाव, पत्ता,बिझनेस पत्ता, शिक्षण, चालू उत्पन्न आणि किती कर्ज हवे हे सगळे डिटेल्स भरावे लागते. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग फी द्यावी लागत नाही. घेतलेल्या कर्जाची रक्कम तुम्ही पाच वर्षाच्या मुदतीवर परत करू शकतात
Published on: 03 October 2021, 12:46 IST