Others News

सध्या भारतात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले असून असंख्य तरुण बेरोजगार आहेत की त्यांच्या हाताला काम नाही. अक्षरशा नोकरीसाठी वणवण भटकण्याची पाळी सुशिक्षित तरुणांवर आली आहे.

Updated on 19 June, 2022 11:54 AM IST

सध्या भारतात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले असून असंख्य तरुण बेरोजगार आहेत की त्यांच्या हाताला काम नाही. अक्षरशा नोकरीसाठी वणवण भटकण्याची पाळी सुशिक्षित तरुणांवर आली आहे.

अशा परिस्थितीत  अगदी छोट्या-छोट्या व्यवसायांमधून जर चांगले नियोजन आणि बाजारपेठेचा अभ्यास केला किंवा बाजारपेठेत असलेली व्यवसायांना मागणी संबंधित याचा अभ्यास करून जर व्यवसाय स्थापन केला तर नक्कीच प्रगती होणे अवघड नाही.

नवीन व्यवसाय मोठ्या स्वरूपात सुरू करणे असा काही नियम नाही. अगदी छोट्या छोट्या प्रमाणात चांगला मागणी असलेल्या व्यवसाय उभारला तर नक्कीच चांगला आर्थिक नफा मिळू शकतो. या लेखामध्ये आपण अशाच एका उत्तम आणि खात्रीशीर पैसे देणाऱ्या व्यवसायाची माहिती घेऊ.

नक्की वाचा:टरबूज शेती: टरबूज लागवड करतात तर त्यावर प्रक्रिया करून 'हे'पदार्थ बनवले आणि विकले तर मिळवाल बंपर नफा

चांगला नफा देणारा खात्रीशीर व्यवसाय

 मोबाईल आणि लॅपटॉप रिपेरिंग व्यवसायाला खूप चांगले दिवस आहेत. अगदी छोट्या पासून ते मोठ्या मोठ्या शहरांपर्यंत या व्यवसायाला चांगली मागणी आहे.

कारण आपल्याला माहिती आहेच की,  मोबाईल आणि लॅपटॉप हे दोन्ही गॅझेट प्रत्येक जण मोठ्या प्रमाणात वापरतात.त्यामुळे या व्यवसायात एक बंपर कमाईची पुर्ण ताकत आहे.

लॅपटॉप आणि मोबाईलच्या वाढत्या मागणीमुळे त्याची दुरुस्ती करणाऱ्यांची मागणीदेखील वाढत आहे. जर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्या अगोदर त्या व्यवसायाचे संपूर्ण माहिती तुम्हाला असणे खूपच गरजेचे आहे.

राहिला विषय तो मोबाईल आणि लॅपटॉप रिपेरिंग शिकण्याचा तर ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील शिकू शकतात.परंतु ऑनलाइन पद्धतीने शिकण्यापेक्षा एखाद्या संस्थेत ऍडमिशन घेऊनकमी कालावधीत उपलब्ध असलेला एखादा अभ्यासक्रम पूर्ण केला तर कमी कालावधीत तुम्ही रिपेरिंग शिकू शकतात. एखाद्या मोबाईल रिपेरिंग सेंटर मध्ये काम करून थोडासा अनुभव घ्यावा व नंतर स्वतःच्या रिपेरिंग सेंटर उघडावे.

परंतु कुठलाही व्यवसाय स्थापन करण्या आधी मोक्याची जागा निवडणे खूप गरजेचे असते. त्यासाठी तुमचे रिपेरिंग सेंटर उघडण्याच्या अगोदर ज्या ठिकाणी संगणक दुरुस्ती केंद्र येत नसेल अशी जागा निवडावी.तुमच्या व्यवसायाच्या प्रचार करण्यासाठी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर मोठ्या कौशल्याने केला तर खूपच फायदा होऊ शकतो.

नक्की वाचा:आईस क्यूब व्यवसाय: उन्हाळ्यात बंपर कमाई देईल हा व्यवसाय, धाडस करुन करा सुरु

 लागणारे साहित्यचा जर विचार केला तर आगोदर तुम्हाला खूप साहित्य ठेवण्याची गरज भासत नाही. त्यासाठी तुम्हाला फक्त हार्डवेअर तुमच्या सोबत ठेवावे

लागतील त्यामध्ये मदरबोर्ड, हार्ड ड्राईव्ह, प्रोसेसरआणि साऊंड कार्ड वगैरे गोष्टी मोठ्या प्रमाणात ठेवण्याचे काहीही गरज नाही.कारण तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही ते लगेच ऑर्डर करू शकतात.

व्यवसायातील कमाई                                                              

 तुम्ही एखाद्या गावात किंवा शहरात तुमच्या रिपेरिंग सेंटर उभे केल्यास आपण भरपूर पैसे कमवू शकतात.दोन ते तीन लाख रुपये खर्चून तुम्ही चांगल्या पद्धतीचे संगणक दुरुस्ती केंद्र सुरू करू शकतात.

तसेच या व्यवसायाची वैशिष्ट्ये म्हणजे तुम्ही दुरुस्तीच नाही तर लॅपटॉप आणि मोबाईल विक्रीचा  देखील व्यवसाय कालांतराने सुरू करू शकतात.

मोबाईल आणि लॅपटॉप रिपेरिंग चे शुल्क खूप जास्त असल्यामुळे तुम्ही महिन्याला व्यवसायात चांगला जम बसल्यावर तीस ते चाळीस हजार रुपये सहज कमवू शकतात.

नक्की वाचा:Technology: वाळलेली फुले आणि पाने वाढवतील शेतकऱ्यांचे उत्पन्न, नवीन तंत्रज्ञान विकसित

English Summary: set up mobile repairing center and earn more income and profit
Published on: 19 June 2022, 11:54 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)