महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी बँका अनेक प्रकारच्या योजना राबवत आहेत. महिलांचे सबलीकरण व्हावे हे या योजनांमागील उद्देश आहे. या योजनाचा लाभ घेऊन महिला आपल्या स्वताचा व्यवसाय सुरु करू शकतील किंवा चालू असलेला व्यवसाय पुढे व्यवस्थिपणे वाढवतील. या लेखातून महिलांसाठी कोणत्या योजना सुरु करण्यात आल्या आहेत, याची माहिती घेऊया.
अन्नपूर्णा स्कीम (Annpurna Scheme)
जर आपल्याला स्वयंपाक बनवण्याची आवड आहे, आणि आपण आपला स्वताचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आपण फूड कॅटरिंगच्या व्यवसायासाठी (Food Catering Business) या योजनेचा फायदा घेऊ शकता.
यात टिफिन सर्व्हिस किंवा पॅक स्नॅक्स इत्यादीचे काम करु शकतात. यासाठी तुम्ही स्टेट बँक ऑफ म्हैसूरशी संपर्क करा.
किती मिळेल कर्ज - या योजनेअंतर्गत ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज तुम्हाला मिळू शकते. हे कर्ज आपल्याला ३६ महिन्यात फेडावावे लागते. या कर्जाचे व्याज बाजारात चालू असलेल्या दराप्रमाणे आकारले जाते.
स्त्री शक्ती पॅकेज स्कीम (Stri Shakti Package Scheme)
या योजनेच्या अंतर्गत कंपन्यांना कर्ज मिळते ज्या कंपन्यांमध्ये महिलांची हिस्सेदारी ५० टक्क्यांपेक्षा जास्त असेल. यासाठी व्याजदर फार कमी असते.
किती मिळते कर्ज - या योजनेतेर्गंत ५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज आपणांस मिळते. जर आपण ५ लाखाचे कर्ज घेणार असाल तर आपल्याला कोर्ड सिक्योरिटी द्यावी लागत नाही. या कर्जासाठी आपण एसबीआय या बँकेशी संपर्क करावा.
उद्योगिनी स्कीम - (Udhyogini Scheme)
या योजनेच्या आधारे महिलांना छोट्य़ा पातळीवर व्यवसाय सुरु करता येतात. रिटेल बिझनेस आणि एग्रीकल्चर एक्टिविटीजसाठी आपण कर्ज मिळवू शकता. यासाठी वयाची पात्रता ही १८ ते ४५ वर्षापर्यंतची आहे. किती मिळेल कर्ज - या योजनेतून आपल्याला एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. यासाठी आपण पंजाब एंड सिंध बँकेशी संपर्क करावा.
Published on: 17 July 2020, 08:31 IST