आयुष्यभर प्रत्येक जण आयुष्यात चांगले जगता यावे यासाठी काबाडकष्ट करतात व या कष्टातून मिळवलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवावा आणि त्याचा चांगला परतावा आपल्याला मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते.
त्यातच वार्धक्यात आर्थिक चणचण भासू नये या दृष्टिकोनातून भविष्यकालीन नियोजन करण्यावर देखील बरेच जण भर देतात. बरेच सरकारी नोकरदारांना पेन्शनचे सुविधा मिळत राहते. परंतु ज्या व्यक्ती सरकारी नोकरीत नाहीत अशांना त्यांचा वार्धक्याचा काळ सुरक्षित आणि सुखकारक जावा यासाठी भविष्यकालीन दृष्टिकोनातून आर्थिक नियोजन करणे खूप गरजेचे असते.
येणारा काळ कसा येईल हे कुणालाच सांगता येत नाही त्यामुळे व्यवस्थित गुंतवणूक, आर्थिक नियोजन ठेवणे हे कधीही चांगले. तसे पाहायला गेले तर गुंतवणुकीसाठी विविध प्रकारचे पर्याय अवलंबून आहेत. परंतु उपलब्ध पर्याय हे विश्वास ठेवण्याजोगे कितपत असतात हे देखील पाहणे गरजेचे असते.
त्यामुळे बरेच जण सुरक्षित गुंतवणूक पर्यायांचा विचार करतात. आता आपल्याला माहित आहेच की, व्यवस्थित आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी एलआयसी हे एक प्रसिद्ध नाव आहे. याच एलआयसीची एक पेन्शन योजना आहे जी पती-पत्नी दोघांना एक यांच्या स्वरूपात चांगल्या भक्कम आणि सुरक्षित आर्थिक भविष्य देऊ शकते. या पेन्शन योजनेचे नाव आहे सरल पेन्शन योजना हे होय.
नक्की वाचा:LIC Policy:दररोज भरा 45 रुपये आणि प्रतिवर्षी मिळवा 36 हजार रुपये, वाचा सविस्तर माहिती
एलआयसीची सरल पेन्शन योजना
पेन्शन घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही एलआयसीची चांगली योजना असून तुम्हाला यामध्ये दरमहा 12 हजार रुपये पेन्शन मिळते. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्हाला एकदाच प्रीमियम भरावा लागतो व त्यानंतर 60 वर्षांनंतर तुम्हाला 12 हजार रुपये पेन्शन सुरू होते. पेन्शनचे पैसे तुम्हाला संपूर्ण आयुष्यभर मिळत राहतात.
या योजनेचे नियम
खरेदी किमतीच्या शंभर टक्के परताव्या सहजीवन वार्षिकी ही पेन्शन योजना सिंगल लाईफ साठी आहे. याचा अर्थ असा की ही योजना फक्त एका व्यक्तीचे जोडली जाईल. जोपर्यंत पेन्शन धारक जिवंत आहे तोपर्यंत त्यांना पेन्शन मिळत राहील.
परंतु पेन्शन धारकाच्या मृत्यूनंतर संबंधित नोंदणीला बेस प्रीमियम मिळेल. संयुक्त जीवनासाठी ही पेन्शन योजना दिली जात असून यामध्ये पती व पत्नी दोघांना पेन्शन मिळते. पती व पत्नी या दोघांमध्ये जो जास्त काळ जगतो त्याला पेन्शन मिळते. या दोघांपैकी जर कोणीही हयात नसेल तर नोंदणीला बेस प्रीमियम म्हणजेच मूळ किंमत मिळते.
नक्की वाचा:सुकन्या योजनेत मोठे बदल! तुमच्यावर खात्यावर होईल थेट परिणाम
या योजनेची वैशिष्ट्ये
1-या योजनेत विमा धारकासाठी, पॉलिसी घेतल्याबरोबर त्यांचे पेन्शन सुरू होते.
2- यामध्ये तुम्हाला पेन्शन प्रति महिन्याला हवी आहे की तीन महिन्यात किंवा सहा महिन्यात किंवा वर्षात हा पर्याय तुम्हाला निवडावा लागतो.
3- पेन्शन योजना ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्हीही पद्धतीने घेता येते.
4-या योजनेत किमान बारा हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल यामध्ये गुंतवणूकीची कुठलीही जास्तीत जास्त मर्यादा नाही.
5- योजना घेण्यासाठी वय हे कमीत कमी 40 ते जास्तीत जास्त 80 असणे गरजेचे आहे.
6- या पॉलिसीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत पॉलिसीधारकाला पॉलिसी सुरू झाल्याच्या तारखेपासून सहा महिन्यानंतर कधीही कर्ज मिळते.
नक्की वाचा:Bima Ratna Policy: एलआयसीने लॉन्च केली विमारत्न पॉलिसी, जाणून घेऊ या पॉलिसीचे फायदे
Published on: 12 June 2022, 10:57 IST