सॅमसंग (Samsung) एक प्रमुख स्मार्टफोन निर्माती कंपनी लवकरच आपला एक नवीन स्मार्टफोन बाजारात आणणार असल्याची माहिती समोर येत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, सॅमसंग M53 5G हा स्मार्टफोन लॉन्च (Smartphone launch) करण्यासाठी जोरात तयारी करीत आहे. असे सांगितले जात होते की सॅमसंग आपल्या A53 या स्मार्टफोनच्या रिब्रँडेड व्हर्जनमध्ये हा स्मार्टफोन लॉन्च करेल
मात्र, आता एका नवीन रिपोर्टनुसार असे सांगितले गेले आहे की, या लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोनमध्ये A53 पेक्षा अनेक नवीन फिचर्स बघायला मिळणार आहेत. सॅमसंगच्या या अपकमिंग स्मार्टफोन ची माहिती एका प्रतिष्ठित यूट्यूब चैनल दिली आहे.
नवीन स्मार्टफोनमध्ये असतील हे फिचर्स
Samsung कंपनी या अपकमिंग फोनमध्ये 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा फुल एचडी + सुपर AMOLED डिस्प्ले देणार आहे. या नवीन फोनमध्ये आढळणारे हे डिस्प्ले सेंटर पंच-होल डिझाइनसह मिळू शकते. या फोनच्या मागील डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर, हे मागील वर्षी लॉन्च झालेल्या Galaxy M62 सारखे बघायला मिळू शकते.
कंपनी हा फोन 8 GB रॅम आणि 256 GB पर्यंत इंटरनल स्टोरेज सह लॉन्च करणार असल्याचे सांगितले गेले आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेंशनचे प्रोसेसर दिले जाऊ शकते.
हेही वाचा:- खरं काय! 70 हजाराचा iPhone 13 Mini मिळतोय मात्र 45 हजारात; जाणुन घ्या या स्पेशल ऑफर विषयी
कॅमेऱ्यासाठी ओळखला जाईल हा नवीन फोन
फोटोग्राफीसाठी हा सॅमसंग चा नवीन फोन उत्तम असू शकतो. या नवीन फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह क्वाड कॅमेरा सेटअप आपल्याला बघायला मिळणार आहे.
यामध्ये 108-मेगापिक्सेल प्राथमिक सेन्सरसह 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 2-मेगापिक्सेल मॅक्रो आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ लेन्स असणार असल्याचे सांगितलं गेले आहे. या नवीन फोनला 5000mAh बॅटरी मिळण्याची शक्यता आहे, जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
Published on: 14 March 2022, 10:24 IST