देशात ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी यापुढे किचकट प्रक्रियेतून जावे लागणार नाही. तसेच आता आरटीओमध्ये जाण्याची किंवा रांगेत थांबण्याची गरज भासणार नाही. कारण केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत.
एक जुलैपासून ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी नियमात बदल लागू होणार
वास्तविक वाहन चालवण्याचा परवाना धारकांना दिलासा देण्यासाठी आणि रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने नियमांमध्ये बदल केले आहेत.
अगोदर ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी लोकांना वारंवार आरटीओ कार्यालयात जावे लागत होते. परंतु आता या नियमांमध्ये बदल केल्यानंतर ते बनवण्याची प्रक्रिया अधिक सोपी होणार असून ती पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही. हा नवीन नियम एक जुलै 2022 पासून लागू होणार आहे.
नक्की वाचा:मोदी सरकारचा हरभरा उत्पादकांना मोठा धक्का; पुन्हा एकदा खरेदीवर बंदी,शेतकरी आर्थिक अडचणीत
ड्रायव्हिंग लायसन्स बाबत नवीन नियम काय आहेत?
नव्या नियमानुसार आता लोकांना ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी टेस्ट देण्याची गरज भासणार नाही. त्याऐवजीं लोकांना आता कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये नोंदणी करावी लागेल. यासाठी लोकांना आता ड्रायव्हिंग लायसन साठी डीएल कोर्स दिला जाणार आहे.
नक्की वाचा:रेशन कार्ड धारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय, आता रेशन घेण्यासाठी….
या अभ्यासक्रमांतर्गत लोकांना ड्रायव्हिंग शी संबंधित थेअरी आणि प्रॅक्टिकल अशा दोन्ही गोष्टी सांगितल्या जातील.
जर आपण या कोर्स बद्दल विचार केला तर लाईट मोटर वेहिकल च्या अभ्यासक्रमासाठी चार आठवडे आणि एकूण 29 तास लागतील.
हा अभ्यासक्रम पास केल्यानंतर तुम्हाला एक प्रमाणपत्र मिळेल. या प्रमाणपत्राच्या माध्यमातून तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्स कोणत्याही विलंबा शिवाय आणि लांब रांगेत न उभे राहता आणि कुठल्याही कटकटी शिवाय सहज बनवले जाईल.
Published on: 25 June 2022, 11:27 IST