Others News

भारतामध्ये खूप वेगळ्या प्रकारचे बाईक्स आहेत. परंतु आजही रॉयल एनफिल्डचा दबदबा कायम आहे. रॉयल एनफिल्ड म्हटले म्हणजे डोळ्यासमोर येते ती बुलेट. आजही तरुणांमध्ये रॉयल एनफिल्डच्या बाईकची जबरदस्त क्रेझ आहे आणि तसा कंपनीचा ग्राहक वर्ग देखील खूप मोठा आहे.

Updated on 06 July, 2022 8:19 AM IST

भारतामध्ये खूप वेगळ्या प्रकारचे बाईक्स आहेत. परंतु आजही रॉयल एनफिल्डचा दबदबा कायम आहे. रॉयल एनफिल्ड म्हटले म्हणजे डोळ्यासमोर येते ती बुलेट. आजही तरुणांमध्ये रॉयल एनफिल्डच्या बाईकची जबरदस्त क्रेझ आहे आणि तसा कंपनीचा ग्राहक वर्ग देखील खूप मोठा आहे.

याच पार्श्वभूमीवर रॉयल एनफिल्डने आपल्या ग्राहकांमध्ये असलेली क्रेझ कायम टिकून राहावी यासाठी एक उत्तम सेवा सुरू केली आहे.

त्या सेवेचे नाव डिजिटल रोडसाइड असिस्टन्स अर्थात आरएसए असे आहे. हे सेवा रॉयल एनफिल्ड बुलेट,मेटिअर, क्लासिक, इलेक्ट्रा, 650 ट्विन्स आणि हिमालयन बाईकच्या ग्राहकांसाठी उपलब्ध असेल.

समजा तुम्ही कुठे जात असताना  आमची बाईक रस्त्यातच खराब झाली तर तुम्हाला त्याठिकाणी जागेवरच कंपनीकडून मदत मिळेल. यासाठी तुम्ही रस्त्याच्या कडेला असलेल्या सहाय्यक सेवेचा लाभ घेऊ शकतात. या सेवेचा लाभ कसा घ्यावा याची माहिती आपण या लेखात घेऊ.

नक्की वाचा:भारीच! आता तुमची Activa इलेक्ट्रिक करा, एका वेळेस १०० किमी चालणार...

 आरई 'ॲप'च्या माध्यमातून या सुविधेचा लाभ

 ज्या ठिकाणी तुमची रॉयल एनफिल्ड खराब होईल त्या ठिकाणाहून तुम्ही रस्त्याच्या कडेला असलेल्या मदतीसाठी आरई ॲपच्या माध्यमातून विनंती पाठवू शकतात.

तुमची बाइक कुठे जात असताना रस्त्यात खराब झाली, त्याच्यामध्ये काही किरकोळ दोष आढळला तर कंपनीचा टेक्निशियन जागेवरच तुमच्या  मदतीला येईल.

परंतु कदाचित बाईक मध्येमोठा बिघाड निर्माण झाला तर तुमची बाईक सर्विस स्टेशन पर्यंत नेण्याची सुविधा देखील उपलब्ध केली जाणार आहे. विशेष म्हणजे रॉयल एनफिल्डने सुरू केलेली आरएसए सुविधा संपूर्ण भारतभर उपलब्ध असेल.

नक्की वाचा:Royal Enfield: रॉयल एनफील्डची ही 2 लाखांची बाईक मात्र 22 हजारात खरेदी करता येणार, कसं ते वाचा

या सेवेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या सेवेअंतर्गत मजुरी आणि प्रवास त्याचा सगळा खर्च रॉयल एनफिल्ड स्वतः उचलणार आहे.

यासाठी ग्राहकाला फक्त कंपनी वारंटी आणि वार्षिक देखभाल करार अंतर्गत चे बाईकचे भाग समाविष्ट नाहीत त्या भागांसाठी फक्त पैसे द्यावे लागतील.

 या सगळ्या सेवेसोबत कंपनीच्या आणखी सेवा

 जर एखाद्या ग्राहकाला त्यांच्या घरीच किंवा ऑफिसमध्ये काही सर्विस हवी असेल तर प्रती करार फक्त दोन वेळा आरएसए सेवेचा लाभ घेता येईल.

या सेवेअंतर्गत बॅटरी ड्रेन, चुकीची इंधन, की लॉकआऊट मेडिकल रेफरल, फ्लॅट टायर सहाय्य इत्यादी देखील समाविष्ट असेल मात्र यासाठी ग्राहकांना पैसे द्यावे लागतील. ही सेवा संपूर्ण भारतभर उपलब्ध असून वार्षिक एक हजार रुपये देऊन कराराचे नूतनीकरण देखील तुम्ही करू शकतात.

नक्की वाचा:Bajaj pulsar: 20 हजारात खरेदी करा बजाज पल्सर, कसं ते जाणून घ्या

English Summary: royal enfield give so importanr service to royal enfield customer
Published on: 06 July 2022, 08:19 IST