Others News

आता रॉयल एनफिल्ड ( Royal Enfield ) कंपनी देखील इलेक्ट्रिक बाईकची निर्मिती करण्याच्या तयारीत आहे. सर्व दुचाकी वाहननिर्मिती करणाऱ्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक बाईकची निर्मिती करत आहेत.

Updated on 04 April, 2022 5:55 PM IST

सध्या भारतात इलेक्ट्रिक बाईकची (Electric bike) क्रेझ वाढताना दिसत आहे. आता रॉयल एनफिल्ड ( Royal Enfield ) कंपनी देखील इलेक्ट्रिक बाईकची निर्मिती करण्याच्या तयारीत आहे. सर्व दुचाकी वाहननिर्मिती करणाऱ्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक बाईकची निर्मिती करत आहेत.

रॉयल एनफिल्ड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ लाल (Siddharth Lal) म्हणाले की, "कंपनी इलेक्ट्रिक दुचाकींवर वेगाने काम करत आहे. उत्पादन आणि जागतिक बाइक मार्केटनुसार इलेक्ट्रिक बाइकची श्रेणी आणि वैशिष्टये यावर चर्चा केली जात आहे", असे सिद्धार्थ लाल म्हणाले आहेत.

सूत्राच्या माहितीनुसार, या इलेक्ट्रिक बाईकसोबत ८ ते १० किलोवॅट-तास बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो. जो मजबूत इलेक्ट्रिक मोटरने सुसज्ज असेल. तसेच सध्याचे या बाईकची मोटर ४० Bhp पॉवर आणि १०० Nm पीक टॉर्क असणार आहे. येत्या काही दिवसांत रॉयल एनफिल्ड कंपनीकडून इलेक्ट्रिक बाईकची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या :
Tata's Electric Car: टाटाची ही गाडी चार्जिंगचे सगळे रेकॉर्ड मोडणार; जाणून घ्या कारचे फिचर आणि किंमत
आता मराठवाड्याचे टेन्शन मिटले; फळपिकाबाबात राज्य सरकारचा मोठा निर्णय
शेतकऱ्याचा नादच खुळा; घोड्यांना जुंपले औताला, मशागत झटक्यात उरकली

रॉयल एनफिल्डचे सीईओ विनोद दासारी (Vinod Dasari, CEO of Royal Enfield) यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये पहिल्यांदा इलेक्ट्रिक बाईकसंदर्भात विधान केलं होतं. "रॉयल एनफिल्डची इलेक्ट्रिक बाईक २०२३ मध्ये कधीही लाँच करण्यात येईल. त्यासाठी कंपनीने ब्रिटनमध्ये रिसर्च देखील सुरु केली आहे. या बाईकची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल", असे रॉयल एनफिल्डचे सीईओ विनोद दासारी यांनी सांगितले होते.

महत्त्वाच्या बातम्या :
मोठी बातमी : बनावट शेतीमालाची विक्री केल्यास आता जेलची हवा खावी लागणार
एप्रिल महिन्यात 'या' भाज्यांची लागवड करून कमवा लाखोंचा नफा..!
तापमानवाढीमुळे जीव गुदमरतोय; घरात लावा 'ही' झाडे आणि मिळवा थंड हवा

English Summary: Royal Enfield discusses electric bikes, abandonment features and powerful range
Published on: 04 April 2022, 05:55 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)