Others News

रिझर्व बँकेच्या पतधोरण आढावा बैठकीत रिझर्व बँकेने रेपो दरात 0.50 म्हणजेच 50 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे एवढेच नाही तर ही व्याजदरवाढ तत्काळ प्रभावाने लागू होणार असल्याचे रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले. यामुळे आता बँकेचा रेपोदर हा 5.40 टक्क्यांवर गेला आहे.

Updated on 05 August, 2022 2:45 PM IST

रिझर्व बँकेच्या पतधोरण आढावा बैठकीत रिझर्व बँकेने रेपो दरात 0.50 म्हणजेच 50 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे एवढेच नाही तर ही व्याजदरवाढ तत्काळ प्रभावाने लागू होणार असल्याचे रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले. यामुळे आता बँकेचा रेपोदर हा 5.40 टक्क्यांवर गेला आहे.

काय होईल याचा परिणाम?

 रिझर्व बँकेने रेपो दरात वाढ केल्यामुळे होम लोन, शैक्षणिक लोन, पर्सनल लोन तसेच कार लोन महागणार आहे. म्हणजेच आधी  महागाईने त्रस्त असलेल्या जनतेवर आणखीन आर्थिक भार पडणार आहे.

रिझर्व बँकेने जर व्याजदर वाढवले तर त्याच्या परिणाम हा मागणी आणि पुरवठ्याचे व्यस्त झालेले प्रमाण काही प्रमाणात संतुलित होते व बाजारातील खरेदी वर नियंत्रण येते. त्यामुळे महागाईला थोड्याफार प्रमाणात आळा बसण्यास मदत होते.

नक्की वाचा:बाजार समिती निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार,पण मतदान अधिकार मिळणार कुणाला?

या वर्षात केलेली व्याजदर वाढ

 जर आपण या वर्षाचा विचार केला तर रिझर्व बँकेने 2022 मध्ये झालेल्या मॉनेटरी पॉलिसी बैठकीनंतर रेपोदरात चाळीस बेसिस पॉइंटची वाढ केली होती व रेपो दर 4.40 टक्के झाला होता

व त्यानंतर 8 जून 2022 मध्ये झालेल्या बैठकीनंतर रेपो दरात 50 बेसिस पॉइंटची वाढ करण्याचा निर्णय घेतला होता व रेपोदर 4.90 इतका झाला होता.  म्हणजे आरबीआयने एका महिन्यामध्ये जवळपास 90 बेसिस पॉईंटची वाढ केली होती.

नक्की वाचा:सर्वसामान्यांना मोठा दिलासा; खाद्य तेल होणार स्वस्त, जाणून घ्या आजच्या किमती

 रेपो दर म्हणजे काय?

 रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व्ह बँकेकडून पैसे घेते तो दर होय. म्हणजेच रेपो रेटमध्ये वाढ होणे म्हणजे बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणारे कर्ज दरात वाढ होते,

तर रेपो रेट कमी होणे म्हणजे बँकेला स्वस्तात  पैसे मिळतात म्हणजेच रेपो रेट जर रिझर्व बँकेने वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांनी ग्राहकांना द्यायची कर्जाचे व्याजदर देखील वाढवावे लागतात.

नक्की वाचा:धक्कादायक! 'या' कारणामुळे ६२ लाख शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे फिरवली पाठ

English Summary: reserve bank of india growth in repo rate by 50 basis point
Published on: 05 August 2022, 02:45 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)