शाओमी भारतातील एक प्रमुख स्मार्टफोन निर्माती कंपनी म्हणून विख्यात आहे. या कंपनीचे हँडसेट स्वस्तात आणि दमदार फीचर्स मध्ये उपलब्ध असल्याने मध्यमवर्गीय लोकांची ही कंपनी पहिली पसंत ठरली आहे. या कंपनीचा रेडमी नोट 11 प्रो आणि रेडमी नोट 11 प्रो प्लस हे दोन हँडसेट नुकतेच लॉन्च झाले आहेत. मात्र हा हँडसेट विक्रीसाठी 23 मार्च पासून उपलब्ध होणार आहेत.
आज आपण या हँडसेटचे फिचर्स जाणून घेणार आहोत. शाओमी नेहमीच कमी किमतीतं दमदार फीचर्स वाले हँडसेट बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देते हा हँडसेट देखील कंपनीचा एक मेडियम बजेटचा हँडसेट असणार आहे. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या हँडसेटच्या दमदार फीचर्सविषयी.
Redmi Note 11 Pro हँडसेटचे स्पेसिफिकेशन - या हँडसेटच्या डिस्प्लेबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 6.67-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा Redmi Note 11 Pro 6GB RAM सह येतो. हा रेडमीचा फोन अँड्रॉइड सपोर्ट करतो आणि याला 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.
Redmi Note 11 Pro या हँडसेटचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे कॅमेरे या हँडसेटच्या मागे 108-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो की प्रायमरी कॅमेरा आहे आणि कंपनीने सेल्फीसाठी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. Redmi Note 11 Pro हा Android सपोर्टिंग MIUI वर चालतो. या हँडसेटला कंपनीने 128GB स्टोरेज दिले आहे. कंपनीने हा फोन मिस्टी फॉरेस्ट, टाईम क्यूट पर्पल, शॅलो ड्रीम गॅलेक्सी आणि मिस्टीरियस ब्लॅक अशा चार कलरमध्ये उपलब्ध करून दिला आहे. Redmi Note 11 Pro हा हँडसेट Wi-Fi 802, 11 a/b/g/n/ac/ax, Bluetooth v5.20, NFC आणि USB Type-C वर कनेक्ट केला जाऊ शकतो.
शिवाय, या स्मार्टफोनमध्ये एक्सेलेरोमीटर सेन्सर, अॅम्बियंट लाइट सेन्सर आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर देखील देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन दमदार फिचर्समुळे ग्राहकांच्या पसंतीस खरा उतरणार असल्याचे सांगितले जात आहे. 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजवाला हा हँडसेट आपल्याला 17,999 रुपयात उपलब्ध होणार आहे, शिवाय याचं दुसरं मॉडेल 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटवाला हँडसेट 19,999 रुपयात कंपनी विक्रीसाठी उपलब्ध करून देणार आहे.
हेही वाचा:-
खरं काय! 70 हजाराचा iPhone 13 Mini मिळतोय मात्र 45 हजारात; जाणुन घ्या या स्पेशल ऑफर विषयी
Published on: 12 March 2022, 11:41 IST