Others News

कोरोना कालावधीमध्ये बऱ्याच जणांच्या नोकऱ्या हातच्या चालल्या गेल्या तसेच बऱ्याच जणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अशा तरुणांसाठी आनंददायक बातमी आहे. मध्य रेल्वे 2422 जागांसाठी भरती करणार असून जारी केलेल्या अधिसूचनेनुसार सर्व पदांसाठी शिकाऊ उमेदवारी चा कालावधी एक वर्षांसाठी निश्चित करण्यात आला आहे

Updated on 21 January, 2022 2:03 PM IST

कोरोना कालावधीमध्ये बऱ्याच जणांच्या नोकऱ्या हातच्या चालल्या गेल्या तसेच बऱ्याच जणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अशा तरुणांसाठी आनंददायक बातमी आहे. मध्य रेल्वे 2422 जागांसाठी भरती करणार असून जारी केलेल्या अधिसूचनेनुसार सर्व पदांसाठी शिकाऊ उमेदवारी चा कालावधी एक वर्षांसाठी निश्चित करण्यात आला आहे

या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 फेब्रुवारी 2022 आहे. या भरतीचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे चाचणी द्यावी लागणार नाही, त्यांची थेट निवड केली जाणार आहे. त्यासाठी दहावी आणि आयटीआय अभ्यासक्रमात मिळालेल्या गुणांची मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे. अशा परिस्थितीत इच्छुक उमेदवार  www.rrccr.comवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

 विभागनिहाय जागा

  • मुंबई 1659
  • भुसावळ 418
  • पुणे 152
  • नागपूर 114
  • सोलापूर 79

 या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता….

इच्छुक उमेदवार हे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा बोर्डातून किमान 50 टक्के गुणांसह दहावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच संबंधित ट्रेड मधील राष्ट्रीय ट्रेड प्रमाण पत्र जे एनसीव्हीटी किंवा एससीव्हीटी द्वारे मान्यता प्राप्त असले पाहिजे. निवड झालेल्या उमेदवारांची मुंबई,क्लस्टर भुसावळ, पुणे, नागपूर आणि सोलापूर येथील विविध युनिटसाठी नियुक्ती केली जाईल.

 या भरती साठी वयोमर्यादा

 या भरतीसाठी किमान 15 आणि कमाल 24 वर्षे वय असणे आवश्यक आहे. जे उमेदवार राखीव प्रवर्गातील असतील अशा उमेदवारांना वयात सवलत दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिसूचना पहावी.

 अर्ज करण्याची पद्धत

  • प्रथम मध्य रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे.
  • त्यानंतर रिक्रुटमेंट लिंक वर क्लिक करावे.
  • त्यानंतर फॉर्म भरून फी जमा करावी.
  • लागणारी संबंधित कागदपत्रे अपलोड करावी.
  • फॉर्मची एक प्रत डाउनलोड करावी आणि ती तुमच्याकडे ठेवावी.

नोकरीचे ठिकाण

 मध्य रेल्वे (महाराष्ट्)

English Summary: recruitment of apprentis candidate in central railway in maharashtra
Published on: 21 January 2022, 02:03 IST