कोरोना महामारी च्या काळापासून जेव्हा प्रथम लॉकडाऊन लागले या कालावधीमध्ये बर्याच जणांच्या हातच्या नोकऱ्या गेल्या.अक्षरशा उपासमारीची वेळ आली.शासनाने तसेच खाजगी क्षेत्राने देखील जवळ जवळ सगळ्या नोकर भरती ठप्प केलेल्या होत्या
परंतु आतायातून देश सावरत असताना विविध प्रकारच्या रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होत आहे.शासकीय स्तरावर देखील विविध नोकऱ्यांच्या जाहिराती निघत आहेत तर खासगी क्षेत्रात देखील नोकराच्या उत्तम संधी उपलब्ध होत आहेत.बरेच पदवीधर तरुण सरकारी नोकरीच्याशोधात असतात.अशा पदवीधर युवकांसाठीएक आनंदाची बातमी आहे.भारताची एक अग्रगण्य बँक रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.असिस्टंट पदाच्या जवळ जवळ900 पेक्षा अधिक पदांसाठी ही भरती सुरू करण्यात आली आहे. या लेखामध्ये आपण या भरती प्रक्रिये विषयी जाणून घेऊ.
रिझर्व बँकेत असिस्टंट पदासाठी भरती सुरू
रिझर्व बँक ऑफ इंडियाने 17 फेब्रुवारी 2022 पासून असिस्टंट पदासाठी भरती सुरू केली केली असून ती आठ मार्च 2022 पर्यंत इच्छुक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने आपलाअर्ज सादर करू शकता.
आवश्यक शिक्षण वयोमर्यादा
ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा असेल ते उमेदवार कोणत्याही शाखेचे पदवीधर असावेत व त्यासोबत त्यांनी सदरील अभ्यासक्रम 50 टक्क्यांपेक्षा अधिक गुणांनी पास केलेला असावा.तसेच संबंधित उमेदवाराचे वय हे एक फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावे.सरकारी नियमानुसार आरक्षितवर्गांसाठी वयामध्ये सूट ही कायम असेल.
परीक्षेचा दिनांक आणि पगार
असिस्टंट पदांसाठी 26 ते 27 मार्च 2022 रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे.
ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार असून यासाठी बँकेने ठरवलेले सर्व आवश्यक पात्रता निकष अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना पूर्ण करणे आवश्यक आहे. रिझर्व बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन हा अर्ज करता येणार आहे. च्या उमेदवारांची यादी भरतीमध्ये निवड करण्यात येईल अशा उमेदवारांना 36 ते 40 हजारांपर्यंत पगार मिळू शकतो असे सांगितले जात आहे.
Published on: 03 March 2022, 05:58 IST