Others News

मागील कोरोनाकाळात लॉकडाउन लागल्यानंतर बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या. अनेक जणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. त्यातच सर्व प्रकारच्या नोकर भरती देखील बंद करण्यात आल्या होत्या. परंतु आता हळूहळू सगळी परिस्थिती पूर्वपदावर येत असून शासनाच्या बऱ्याच विभागांमध्ये नोकरीच्या जाहिरात निघत आहेत.

Updated on 07 February, 2022 2:26 PM IST

मागील कोरोनाकाळात लॉकडाउन लागल्यानंतर बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या. अनेक जणांवर  बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. त्यातच सर्व प्रकारच्या नोकर भरती देखील बंद करण्यात आल्या होत्या. परंतु आता हळूहळू सगळी परिस्थिती पूर्वपदावर येत असून शासनाच्या बऱ्याच विभागांमध्ये नोकरीच्या जाहिरात निघत आहेत.

अशीच एक नोकरीची  संधी भारतीय पोस्ट खात्यात चालून आली आहे. त्याबाबत या लेखात माहिती घेऊ.

 पोस्ट विभागामध्ये भरती

 भारतीय पोस्ट विभागात कर्मचारी चालक पदासाठ भरती करण्यात येणार आहे. या भरती मध्ये ज्या उमेदवारांची निवड होईल त्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन दिले जाणार आहे. उर्वरित पदोन्नती कोट्यातील रिक्त जागा थेट भरती च्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.ही भरती एकूण 29 पदांसाठी घेण्यात येणार आहे.

 या भरतीसाठी असलेले पात्रतेच्या अटी

  • उमेदवाराकडे हलके आणि जड वाहनांसाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.
  • वाहन यंत्रणेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.म्हणजेच उमेदवार हा वाहनांमधील किरकोळदोष दूर करण्यास सक्षम असावा.
  • हलकी आणि जड वाहन चालवण्याचा किमान तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेमधून दहावी पास असावा.
  • अतिरिक्त पात्रता- होमगार्ड किंवा नागरी स्वयंसेवक म्हणून तीन वर्षाचीसेवा

 या भरती साठी वयोमर्यादा

 अर्जदाराचे वय 18 ते 27 दरम्यान असावे. तसेच एससी आणि एसटी कॅटेगरी उमेदवारांसाठी पाच वर्षे वयात सवलत तर ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षे वयात सवलत असेल.

 भरतीसाठी निवड प्रक्रिया

 मोटर यंत्रणेतील ज्ञान आणि वाहनातील किरकोळ दोष दूर करण्याची क्षमता यासोबतच जड आणि हलकी मोटर वाहने चालवण्याचे क्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी विभागाने विहीत केलेल्या चाचणी च्या माध्यमातून निवड केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना चाचणीची तारीख आणि ठिकाण स्वतंत्रपणे सूचित केले जाईल.

या भरतीसाठी चे उमेदवार पात्र आणि इच्छुक असतील अशा उमेदवारांनी 15 मार्च 2022 पूर्वी किंवा त्या रोजी विहित नमुना नुसार या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज हेयोग्य आकाराच्या जाड कागदाच्या लिफाफ्यात पाठवावेत.लिफाप्यायाच्या मुखपृष्ठावर स्पष्टपणे कर्मचारी पदासाठी अर्ज असे लिहावे.

 कॅटेगरी नुसार पदसंख्या

  • सर्वसाधारण प्रवर्गासाठी पंधरा पदे
  • ओबीसी प्रवर्गासाठी आठपदे
  • अनुसूचित जातींसाठी तीन पदे
  • ईडब्ल्यूएस साठी तीन पदे
English Summary: recruitment in post office for 10 th passed student for driver post
Published on: 07 February 2022, 02:26 IST