Others News

कोरोना मुळे बऱ्याच तरुणांचा रोजगार गेला आहे आणि बर्या च ठिकाणी नोकर कपात करण्यात आली आहे. नोकर कपात आणि काही ठिकाणी वेतन कपात त्यामुळे तरुणाई होरपळून निघत आहे. त्यामुळे तरुण आत्ता विविध प्रकारच्या नोकरीच्या संधी च्या शोधात आहेत. अशातच परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात एकूण सात रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्याबद्दल या लेखात माहिती घेऊ.

Updated on 29 June, 2021 1:06 PM IST

 कोरोना मुळे बऱ्याच तरुणांचा रोजगार गेला आहे आणि बर्‍याच ठिकाणी नोकर कपात करण्यात आली आहे. नोकर कपात आणि काही ठिकाणी वेतन कपात त्यामुळे तरुणाई होरपळून  निघत आहे. त्यामुळे तरुण आत्ता विविध प्रकारच्या नोकरीच्या संधी च्या शोधात आहेत. अशातच परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात एकूण सात रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्याबद्दल या लेखात माहिती घेऊ.

 परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये वरिष्ठ संशोधन सहकारी, प्रकल्प सहाय्यक, कुशल मदतनीस या पदांसाठी जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी कृषी विद्यापीठाने  नवीन भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवारांनी  https://www.vnmkv.ac.in या संकेत स्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे. संबंधित पदांसाठीची मुलाखती 3-6-2021 रोजी होणार आहे.

 जागा निहाय पदसंख्या

  • वरिष्ठ संशोधन सहकारी – एकूण दोन जागा
  • प्रकल्प सहाय्यक – एकूण दोन जागा
  • कुशल मदतनीस – एकूण तीन जागा

 या भरतीसाठी असलेली पदनिहाय शैक्षणिक पात्रता

  • वरिष्ठ संशोधन सहकारी पदासाठी - कृषी क्षेत्रात एम एस सी (msc) आवश्यक
  • प्रकल्प सहाय्यक पदासाठी- कृषी क्षेत्रात बीएससी (BSC)
  • कुशल मदतनीस या पदासाठी- कृषी क्षेत्रात डिप्लोमा आवश्यक आहे.

 

 

 पदनिहाय दरमहा मिळणारे वेतन

  • वरिष्ठ संशोधन सहकारी पदासाठी वेतन – एकतीस हजार रुपये
  • प्रकल्प सहाय्यक पदासाठी वेतन- पंधरा हजार रुपये
  • कुशल मदतनिस पदासाठी वेतन- दहा हजार रुपये

 

English Summary: Recruitment in krishi vidyapith
Published on: 29 June 2021, 01:06 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)