सैन्यदलात भरती होऊन देशसेवेचे स्वप्न बाळगणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय सैन्य दलाने शॉर्ट सर्व्हिस कमिशन अर्थात एसएससी अंतर्गत अविवाहित पुरुष आणि महिलांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे
8 मार्च 2022 पासून जे उमेदवार पात्र व इच्छुक असतील अशा उमेदवारांनी इंडियन आर्मी चे joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख सहा एप्रिल 2022 आहे.
एकूण पदसंख्या
या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून भारतीय सैन्यामध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन च्या 191 पदांसाठी ही भरती केली जाणार असून यामध्ये अविवाहित पुरुषांसाठी 175 पदे असून 14 पदेही अविवाहित महिलांसाठी आहेत. तर उरलेली दोन पदे ही संरक्षण कर्मचाऱ्यांच्या विधवांसाठी आहेत.
निवड प्रक्रिया
शॉर्ट सर्व्हिस कमिशन मुलाखत आणि मेडिकल परीक्षेच्या आधारे या पदांच्या भरतीसाठी निवड केली जाणार आहे. शॉर्ट सर्व्हिस कमिशन ( तांत्रिक ) अभ्यासक्रम आक्टोबर 2022 पासून ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, चेन्नई तामिळनाडू येथे सुरू होईल.
या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून अभियांत्रिकी पदवी धारण केलेला असावा.
उमेदवाराची वयोमर्यादा
उमेदवाराचे किमान वय 20 वर्ष असावे आणि कमाल वय 27 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
मिळणारा लाभ
ज्या उमेदवारांची या पदांसाठी निवड केली जाईल अशा उमेदवारांना ट्रेनिंग दरम्यान प्रतिमाह 56 हजार 100 रुपये स्टायपेंड देखील दिला जाईल. अधिक माहितीसाठी इंडियन आर्मीची joinindianarmy.nic.in या संकेत स्थळावर माहिती पहावी.
Published on: 09 March 2022, 12:08 IST