नोकरीच्या शोधात असणाऱ्या सुशिक्षित तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदानेनोकरभरतीची अधिसूचना जारी केली आहे.या भरतीमध्ये 42 पदे असून हे कंत्राटी पद्धतीने भरण्याचे ठरवले होते.
बँकेच्या या भरतीच्या माध्यमातून फसवणूक आणि जोखीम व्यवस्थापन विभागात पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी ची अर्ज करण्यासाठी ची अंतिम मुदत ही 15 मार्च आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी या तारखेपूर्वी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळ bankofbaroda.in वर जाऊन अर्ज करू शकतात. ही भरती एकूण 42 रिक्त जागांसाठी घेण्यात येणार आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम in या बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- त्यानंतर उमेदवार करियर टॅबच्या माध्यमातून सध्याच्या संधी वर क्लिक करा.
- फसवणूक जोखीम आणि जोखीम व्यवस्थापन विभागासाठी नियमित/ कंत्राटी या आधारावर विविध पदांसाठी भरती आता अर्ज करा वर क्लिक करा.
अर्ज भरा आणि त्यानंतर पोस्ट निवडा.
- आवश्यक सगळी कागदपत्रे अपलोड करा आणि नंतर फी भरा.
- फी भरल्यानंतर अर्ज सबमिट करा.
- उमेदवारांनी भरलेल्या अर्जाची प्रिंट आउट भविष्यातील कामासाठी किंवा कसल्या संदर्भासाठी स्वतःकडे ठेवावे.
या भरतीच्या महत्त्वपूर्ण तारखा
- अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख 23 फेब्रुवारी 2022
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2022 आहे.
ही भरती एकूण 42 रिक्त जागांसाठी घेण्यात येणार आहे.
या भरतीसाठी लागणारे शुल्क
जनरल / ईडब्ल्यूएस / ओबीसी श्रेणीतील उमेदवारांना सहाशे रुपये शुल्क भरावे लागेल. तर एस सी/ एसटी / पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवार आणि महिला उमेदवारांना शंभर रुपये शुल्क भरावे लागेल.
Published on: 08 March 2022, 03:02 IST