कोरोना महामारी च्या विळख्यात अख्खे जग आली तेव्हापासून जगातच नाही तर भारतात सुद्धा सगळ्या गोष्टी ठप्प झाल्या होत्या.
लॉक डाऊन मुळेलाखो लोकांच्या हातच्या नोकऱ्या गेल्या,व्यवसाय बुडाले त्यामुळे बऱ्याच कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली. तसेच शासनाने या काळामध्ये सगळ्याच प्रकारच्या नोकर भरती बंद केल्या होत्या. त्यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट बनली. परंतु आता सगळी परिस्थिती सर्वसामान्य झाली असतानाशासनाच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये तसेच खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा नोकरीच्या संधी उपलब्ध केल्या जात असून त्याचा फायदा जास्तीत जास्त तरुणांनी घेण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवरचभारतीय पोस्ट खात्याअंतर्गत भरतीची एक आनंदाची बातमी समोर येत आहे.विशेष म्हणजे भारतीय पोस्ट खात्यात होणारी ही भरती दहावी पास उत्तीर्ण उमेदवारांसाठी होणार असूनजास्तीत जास्त उमेदवारांनी या भरतीचा लाभ घ्यावा.
भारतीय पोस्ट खात्यात भरती
भारतीय डाक विभाग यांच्यातर्फे ग्रामीण डाक सेवक या पदासाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. एक मोठी भरती असून प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार 38 हजार अधिक रिक्त जागा या माध्यमातून भरल्या जाणार आहेत. त्यामुळेइच्छुक उमेदवारांनी जाहिरात वाचून काळजी पूर्वक अर्ज करावेत.
पदाचे नाव
ग्रामीण डाक सेवक
पदांची संख्या
या भरती अंतर्गत एकूण 38 हजार 926 पदे भरली जाणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
दहावीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असून सायकल चालवता येणे आवश्यक आहे.
निवडप्रक्रिया
दहावीच्या परीक्षेत किती गुण मिळाले त्या आधारेकेली जाईल.
वयाची अट
18 ते 40 वर्षे
वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता.
पगार
निवड झालेल्या उमेदवारांना प्रतिमहा दहा हजार रुपये ते 12 हजार रुपये वेतन देण्यात येईल.
अर्ज करण्याची पद्धत
उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात.
अर्ज सुरु होण्याची तारीख
दोन मे दोन हजार बावीस पासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
सहा जून दोन हजार बावीस अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:महाराष्ट्रात ३१ मेपर्यंत शून्य सावली दिवस. जाणून घ्या कुतूहल
नक्की वाचा:काय सांगता! आता बटाट्यापासून तयार होणार प्लास्टिक; वाचा काय आहे हा माजरा
Published on: 05 May 2022, 10:27 IST