Others News

आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या (Financially) मेष राशीसाठी लाभदायक आहे. घरगुती जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका. बोलून कोणाचेही मन दुखवू नका.

Updated on 01 August, 2022 11:07 AM IST

मेष - आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या (Financially) मेष राशीसाठी लाभदायक आहे. घरगुती जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका. बोलून कोणाचेही मन दुखवू नका. कामात मन गुंतवा. तुम्हाला मदतीचा हात पुढे करणाऱ्यांना आश्वासन द्याल. ताणतणावांचा सामना करण्यासाठी ध्यानधारणा करा. शुभरंग : हिरवा

वृषभ - वृषभ राशीच्या (Rashi) लोकांमध्ये अनावश्यक विचार मनात येण्याची शक्यता आहे. सकाळी व्यायाम करण्याला प्राधान्य द्या. ज्या वस्तूंची किंमत वाढण्याची शक्यता आहे, त्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी वेळ काढाल.

कामातील नव्या बदलांमुळे काम करण्याचा उत्साह वाढेल. वकिलांचा कायदेशीर सल्ला घ्यावा लागण्याची शक्यता आहे. शुभरंग : किरमिजी

मिथुन - स्वत:च स्वत:वर उपचार करू नका. आर्थिक प्राप्तीचा नवा मार्ग हाती लागण्याची शक्यता आहे. कुटुंबाच्या पालनपोषणासाठी मेहनतीचा वेगळा पर्याय अवलंबावा लागेल. कामाकडे दूरदृष्टीने पाहा. आध्यात्मिक गुरुंचा सल्ला घेण्याची आवश्यकता भासेल. शुभरंग : मोरपिसी

कर्क - धार्मिक कार्याला भेट देण्याचा योग आहे. आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकारी व्यक्तिकडून दैवी ज्ञान प्राप्त कराल. मित्रांकडून मदत मिळेल. इतरांना आकर्षित करण्याच्या गुणांमुळे लोकांची मने जिंकाल. छोटे छोटे वादविवाद टाळा. प्रलोभनांना बळी पडू नका. शुभरंग : निळा

हे ही वाचा
Onion Rate: कांद्याचे दर वाढले! बाजारपेठेत मिळतोय 'इतका' दर, जाणून घ्या आजचा बाजारभाव

सिंह - आरोग्याची काळजी (Health care) घ्या. गुंतवणुकीचा नवा पर्याय शोधाल. शेजाऱ्यांशी मिळून मिसळून वागा. कोणाचाही द्वेष करू नका. सगळ्यांबरोबर चांगले संबंध जोडून ठेवण्याचा प्रयत्न करा.

व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जोडीदारासोबत मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी वेळ काढाल. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. शुभरंग : खाकी

कन्या - आजचा दिवस कन्या राशीसाठी उत्साही असेल. सायंकाळी प्रिय व्यक्तिसोबत जेवणासाठी बाहेर जाल. आवडीचा सिनेमा बघण्यात वेळ घालवाल. सकाळपासून सायंकाळपर्यंत कामकाजात व्यस्त राहाल. कुटुंबिय आणि मित्रपरिवारासाठी वेळ काढाल. शुभरंग : पांढरा

तूळ - आर्थिक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तिंच्या आरोग्याची काळजी घ्या. आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या प्रसिद्धित वाढ होण्याची शक्यता आहे. प्रामाणिकपणे मेहनत करा यश मिळेल. आवडता पोषाख परिधान कराल. धार्मिक कार्यात भाग घ्यावासा वाटण्याची शक्यता आहे.
शुभरंग : करडा

वृश्चिक - चांगले विचार ग्रहण करण्यासाठी मन तयार असेल. घरगुती वस्तूंच्या खरेदीकरिता जास्त पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. सायंकाळी एखाद्या समारंभानिमित्त पाहुणे घरी येण्याची शक्यता आहे. जोडीदारावर मनासारख्या गोष्टी पूर्ण करून घेण्याकरिता दबाव आणू नका. शुभरंग : जांभळा

धनु - जास्त कॉफी पिऊ नका. ज्या मित्रमैत्रिणींना तुमची गरज आहे, त्यांना मदत करा. अनावश्यक गप्पा मारण्यात वेळ घालवू नका. प्रवास आणि शिक्षण यामध्ये वेळ जाईल. नवीन कामे हाती घेण्याची शक्यता आहे. लाल रंगाचा पोषाख परिधान करा. शुभरंग : पांढरा

हे ही वाचा 
Animal Husbandry: पशुपालकांनो तुमची जनावरे आजारी नाहीत ना? तर 'या' सोप्या मार्गाने ओळखून करा उपचार

मकर - चांगल्या गोष्टी ग्रहण करण्यासाठी मनाची तयारी ठेवा. घराच्या सुशोभिकरणासाठी वेळ काढाल. जोडीदाराची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कराल. आवडते पुस्तक वाचण्यात वेळ घालवाल. मित्रमैत्रिणींवर दबाव टाकू नका. बोलताना मधुरावाणीचा वापर करा. शुभरंग : लाल

कुंभ - भावनांवर नियंत्रण ठेवा. अतिरिक्त पैसे गुंतवण्यासाठी (invest money) मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. आवडती पुस्तके वाचणे, संगीत ऐकणे यामध्ये वेळ घालवाल. प्रिय व्यक्तिची अनपेक्षित भेट होण्याची शक्यता आहे. अनावश्यक बडबड करणे टाळा. आवडत्या रंगाचा पोषाख परिधान करा. शुभरंग : सोनेरी

मीन - तुमचे स्वप्न प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे. अति उत्साहावर नियंत्रण ठेवावे लागेल, कारण अतिआनंदामुळे त्रास होऊ शकते. उत्पन्नवाढीसाठी (income growth) प्रयत्न कराल.

घरगुती समस्यांकडे लक्ष द्यावे लागेल. दीर्घकाळ चाललेले वाद आजच सोडवावे लागतील. घाईघाईने निर्णय घेऊ नका. ज्यामुळे नंतर पश्चात्ताप करावा लागणार नाही. शुभरंग : चंदेरी

महत्वाच्या बातम्या 
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! गॅस सिलेंडर आजपासून स्वस्त; जाणून घ्या किमती
Agricultural Center: काय सांगता! कृषी सेवा केंद्रांची चौकशी होणार; शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा
Pension Scheme: शेतकरी मित्रांनो; पत्नीच्या नावाने उघडा 'हे' अकाउंट, दर महिन्याला मिळतील 45 हजार रुपये

English Summary: Read today's horoscope
Published on: 01 August 2022, 11:00 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)