Others News

जगाच्या पाठीवर असलेल्या सर्व सजीवांची

Updated on 24 July, 2022 4:38 PM IST

जगाच्या पाठीवर असलेल्या सर्व सजीवांची निरनिराळ्या प्रकारांत गणना करायचा प्रयत्न जेव्हा सुरू झाला, तेव्हा असे लक्षात आले की, बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी सुरुवातीला अडत आहेत. अनेक वर्षे वनस्पती समजून चाललेली गोष्ट प्राणी आहे, असे सिद्ध होऊ लागले, तर ? मग पुन्हा एकदा मूळ निष्कर्षांची तपासणी सुरू होत असे.प्राणी सृष्टी- नवनवीन उपकरणे उपलब्ध होत होती. मायक्रोस्कोपची ताकद वाढत चालली होती. कित्येक गोष्टींचा उलगडा नव्याने होत चालला होता. स्पाँज, कोरल, फंगाय यांसारख्या गोष्टींबद्दलची गृहिते पुन्हा पुन्हा तपासली जात होती. मग सरतेशेवटी जगाच्या पाठीवरील जवळजवळ दहा लाख प्राण्यांचे वर्गीकरण चार प्रकारांत केले गेले. प्राणी वर्ग, प्रोटेस्ट किंवा प्रोटोझोआ वर्ग, मोनेरा किंवा जीवाणू वर्ग, फंगाय किंवा बुरशीसदृश वर्ग या चार प्रमुख वर्गांमधील किंवा सृष्टीमधील प्रत्येक जीवाचे काहीतरी वैशिष्टय़ त्या वर्गात घालण्यासाठी हेरले गेले होते.

एकपेशीय प्राणी किंवा तत्सम वर्तणूक असणारे प्रोटिस्ट या वर्गात गेले. मोनेरा या वर्गात सर्व जीवाणू, विषाणू, सूक्ष्मदर्शक यंत्रानेच दिसू शकणारे उपयुक्त किंवा विषारी असे घातले गेले. फंगाय या वर्गात विविध अळंबी, बुरशी येतात. पण गंमत म्हणजे फंगाय वर्गातील मंडळी सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जा व प्रकाशाचा उपयोग वनस्पतीप्रमाणे करत नाहीत. पण जिवंत व मृत वनस्पतींच्या रसावर त्या वाढतात. हा वर्ग या कारणाने पुन्हा ना प्राणी, ना वनस्पती असल्याने वेगळाच काढला गेला.मूलभूत प्रकार एकदा नक्की झाल्यानंतरचे काम त्यामानाने बरेचसे सोपे होते. या प्राण्यांची प्रथम चक्क दोन भागांत विभागणी केली गेली : ज्यांना पाठीचा कणा आहे, असे पृष्ठवंशीय (Vertebrates) किंवा कणा नसलेले अपृष्ठवंशीय (Invertebrates). या वर्गीकरणाला फायलम असे नाव दिले गेले.

नंतरचे वर्गीकरण होते सस्तन प्राणी किंवा अंडी घालणारे प्राणी. त्याला 'क्लास' असे नाव मिळाले. नंतरचे वर्गीकरण होते मांस खाणारे किंवा न खाणारे यांचे. त्यालाच 'ऑर्डर' असे म्हणतात. एखाद्या कुटुंबातील व्यक्ती झटकन त्या कुटुंबाशी काहीतरी साम्य दाखवते, तशी साम्यस्थळे असली, तर त्यांचे वर्गीकरण एकेका फॅमिलीत होऊ लागले. यानंतरचा टप्पा होता जेनरचा. सारख्या वृत्तीचे प्राणी या प्रकारात एकत्र आले. शेवटचा टप्पा होता प्राण्यांशी नेमकी जात व ओळख पटण्याचा. त्याला 'स्पेसीज' असे नाव मिळाले.म्णजेच कोणताही प्राणी आता प्रथम ॲनिमल, प्रोटेस्ट, मोनेरा या सृष्टीतला आहे वा नाही, हे ठरवले जाते. तो अॅनिमल असल्यास नंतर फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीन्स, स्पेसिज Phylum, Class, Order, Family, Jeans, Species या क्रमाने त्याचे वर्णन दिले जाते. हे वर्णन वाचताना आपोआपच छोट्याछोट्या बाबींचा नीट खुलासा होऊ लागतो.

वनस्पतीसृष्टी - साडेतीन अब्ज वर्षांपूर्वीच्या अल्गीपासून वनस्पतींचा इतिहास पृथ्वीवर आढळतो. जीवाश्मांतून उलगडणारा हा इतिहास ज्यावेळी विसाव्या शतकात पोहोचला, त्या वेळी काही ठळक गोष्टींच्या विशेषकरून नोंदी केल्या गेल्या. एकूण वनस्पतींची वर्गावारी, तिची पद्धत ठरवली गेली.वनस्पतींची वर्गवारी पद्धत खूपच सोपी आहे. प्राथमिक स्वरूपाच्या, अगदी पुरातन काळापासून हळूहळू उत्क्रांत होत गेलेल्या वनस्पती या अल्गी, माॅस, फर्न, प्लांक्टन या वर्गात मोडतात. कोनाकृती फळे लागणाऱ्या सूचीपर्णी वर्गातील झाडांचा वर्ग वेगळाच काढला जातो. यानंतरचा टप्पा फुले येणाऱ्या वनस्पतींचा. यामध्ये एकदल व द्विदल असे सोपे भेद केले आहेत.

फुलांनंतर तयार होणारी ही वनस्पती एकदलीय व द्विदलीय आहे, यातून एक हे व भेद ठरतात. मग या प्रत्येक वर्गात असंख्य पोटभेद सामावू शकतात.वनस्पतींची संख्या तीन लाख ऐंशी हजारांच्या घरात भरते. विषुववृत्तावरील पर्जन्यवनात सर्वात जास्त प्रकार एकत्रितपणे बघायला मिळतात. याउलट जसे ध्रुवीय प्रदेशाकडे सरकावे, तशी ही संख्या कमी होत जाते. अंटार्क्टिक व आर्क्टिक प्रदेशात मात्र वनस्पती अभावानेच आढळतात.आपल्या बोलीभाषेतही झाडांचे वर्णन प्रकार वर्णन करताना आपण जे शब्द वापरतो, ते सुद्धा या शास्त्रीय वर्णनासारखेच त्या भागातील हवामाननिदर्शक असतात. म्हणजेच घनदाट राई, काटेरी जाळ्यांची वने, खुरटी झुडपे यांतूनही हाच बोध होतो.

 

प्रसारक : दिपक तरवडे

संकलक : प्रविण सरवदे, कराड

English Summary: Read classification of living things
Published on: 24 July 2022, 04:38 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)