Others News

मोठमोठ्या कंपन्या जेव्हा आपले उत्पादन बाजारात आणतात तेव्हा त्यासाठी अनेक प्रकारच्या कच्च्या मालाची आवश्यकता असते. प्रत्येक वेळी स्वतःची गरज पूर्ण करणे प्रत्येक कंपनीला शक्य नसते अशा वेळी बाहेरून त्यांना तो घ्यावा लागतो.

Updated on 17 May, 2022 2:15 PM IST

 मोठमोठ्या कंपन्या जेव्हा आपले उत्पादन बाजारात आणतात तेव्हा त्यासाठी अनेक प्रकारच्या कच्च्या मालाची आवश्यकता असते. प्रत्येक वेळी स्वतःची गरज पूर्ण करणे प्रत्येक कंपनीला शक्य नसते अशा वेळी बाहेरून त्यांना तो घ्यावा लागतो.

आपण जर हे माध्यम झालो तर आपला स्वतंत्र व्यवसाय सुरु होऊ शकतो. बहुतांश क्षेत्रात या कच्च्या मालाची मागणी असते.

 आपण ती योग्य वेळी आणि योग्य नियोजन आणि पूर्ण करू शकलो तर आपण उत्कृष्ट आणि फायदेशीर कच्चामाल पुरवठा व्यवसायिक बनू शकतो. लेदर, रबर, कच्चे तेल, कापूस, औषधी वनस्पती, लोह, माती अगदी पाणीसुद्धा कच्चामाल असू शकते. हे काही वानगीदाखल. परंतु प्रत्येक उत्पादन क्षेत्रात कच्चामाल लागतो. आपल्याला तो ओळखता यायला हवा.

कच्चामाल पुरवठा व्यवसायात भांडवल आवश्यक आहे. कारण डिलिव्हरी, सप्लाय यात वाहतूक आणिकच्चामाल पुरवठा आवश्यक सामग्रीसाठी पैसा हवाच; पण आपल्याकडे चांगली वाणी, प्रामाणिकपणा असेल आणि योग्य नियोजन असेल तर यावरही आपण मात करून कोणत्याही रोख रक्कमे शिवाय व्यवसाय चालू होऊ शकतो.

 आपणास फक्त घाऊक विक्रेत्याला खात्री देणे आवश्यक आहे की आपण पुरवठा केल्यानंतर पैसे आल्यावर लगेच त्यांना त्यांचे पैसे मिळतील. केवळ कल्पना आणि सचोटीने व्यवसाय सुरू करण्याचा हा एक मस्त मार्ग आहे. आपण खरोखरच कच्चामाल पुरवठा व्यवसाय सुरू करण्यास स्वारस्य असल्यास, येथे काही उत्कृष्ट कच्च्या मालाचा पुरवठा व्यवसायाच्या कल्पना आहेत. या कल्पना असल्यामुळे यांची तोंडओळख देत आहोत.

1)रबर पुरवठा :(Rubber Supply)

 लेटेक्स हा एक कच्चामाल आहे जो प्लास्टिक, इलेक्ट्रॉनिक घटक, कार, मुलांची खेळणी किंवा रबर असलेले कोणतेही उत्पादन यात वापरले जाते. म्हणूनच जर आपण कच्चामाल पुरवठा व्यवसाय सुरु करण्यासाठी शोधत असाल तर आपण लेटेक्स सप्लाय व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता जर आपल्याकडे रबरची लागवड असेल किंवा आपल्याला रबर कसे कुठून मिळू शकते हे माहीत असेल तर हा व्यवसाय आपल्यासाठी योग्य आहे.

2) कच्च्या तेलाचा पुरवठा:(Supply Of Raw Oil)

 कच्च्या तेलाला काळे सोने म्हणूनही ओळखले जाते. याचा वापर पेट्रोल, रॉकेल, डिझेल इत्यादी उत्पादनांमध्ये कच्चामाल म्हणून केला जातो. म्हणूनच जर आपण कच्चामाल पुरवठा करणारा व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल आणि आपण मान्यताप्राप्त एक गुंतवणूकदार असाल तरा पण क्रूड ऑइल सप्लाय व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता. व्यवसाय चालू केल्याच्या थोड्याच कालावधीत व्यवसायिक उलाढाल पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

3) मेण पुरवठा:(Wax Supply)

 मेणाचा व्यवसायिक प्रमाणात पुरवठा हा आणखी एक भरभराट करणारा आणि फायदेशीर कच्चामाल पुरवठा आहे. मेणबत्त्या तयार करताना मेण हे एक प्रमुख कच्चामाल म्हणून वापरले जाते. जर तुमच्या शेजारी किंवा तुमच्या आसपास मेणबत्त्या बनविणार्‍या कंपन्या असतील तर तुम्ही जास्त भाग्यवान. मोठ्या प्रमाणात मेण कसे मिळवावे हे जर तुम्हाला माहीत असेल तर याचा तुम्हाला फायदाच होईल.

4) नारळाचा पुरवठा :

 आपल्या देशात, राज्यात नारळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे कोकणातील व्यावसायिकांसाठी नारळ एक कच्चामाल म्हणून पुरवण्याची मोठी संधी आहे. नारळ, विविध पेय, क्रीम, तेल, औषध, खाण्याचे पदार्थ इत्यादी उत्पादनांमध्ये वापरले जाते. यामुळे हे सिद्ध होते की नारळाला कच्चामाल म्हणून पुरवठा करणे हा एक भरभराट करणारा आणि फायदेशीर व्यवसाय आहे. नारळाच्या खोबऱ्याव्यतिरिक्त अन्य गोष्टींचा ही विविध पद्धतीने उपयोग होतो.

5) रॉ ॲल्युमिनियम चा पुरवठा :

 असाच एक व्यवहार्य आणि फायदेशीर कच्चामाल पुरवठा व्यवसाय म्हणजे कच्चा ॲल्युमिनियम चा पुरवठा. खिडक्या,दारे, छप्पर, पॅन इत्यादींसारख्या ॲल्युमिनियम मधून कित्येक उत्पादने तयार केली जाऊ शकतात.

आपण कच्चामाल पुरवठा व्यवसाय सुरु करण्यासाठी शोधत असाल तर आपण कच्च्या ॲल्युमिनियम च्या पुरवठ्यात जाण्याचा विचार करू शकता.

6) लिंबू आणि त्याप्रकारची साले पुरवठा :

 परफ्यूम आणि हेअर फ्रेशनर्सच्या उत्पादनात लिंबूवर्गीय साली हे कच्चामाल म्हणून वापरले जाते. त्यामुळे त्यांच्या सालीला खूप मागणी असते. जर आपण आपल्या क्लायंटला  देऊ शकाल की आपल्याला नियमितपणे लिंबूवर्गीय साली मोठ्या प्रमाणात मिळू शकतात तर तेआपल्या बरोबर काम करण्यास तयार असण्यापेक्षा अधिक उत्सुक असतील.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:लवकरचा पाऊस शेतकऱ्याच्या मुळावर, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दुष्काळात तेरावा महिना

नक्की वाचा:Good News: भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची संधी,नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी करावे संधीचे सोने

नक्की वाचा:एक लाख विद्यार्थ्यांना विविध कौशल्यांसह सर्वसमावेशक प्रशिक्षण दिले जाईल; केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर

English Summary: raw material supplier business is to give more chance to earning more money
Published on: 17 May 2022, 02:15 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)