नवी मुंबई: रेशनकार्डधारकांना मोफत रेशन देऊन सरकारने मोठी मदत केली आहे. यामुळे लोक खूप प्रसन्न आहेत. सध्या सरकारकडून लोकांना मोफत रेशन दिले जात आहे. आता तुमच्याकडे शिधापत्रिका असल्यास, मोफत रेशनचा लाभ घेण्यासाठी ताबडतोब तुमचे रेशन कार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तुमचे रेशन कार्ड आधारशी कसे लिंक करायचे ते आज आपण जाणुन घेणार आहोत.
रेशनकार्ड आधारशी लिंक करण्यासाठी सरकारने यापूर्वी 31 मार्च ही अंतिम तारीख निश्चित केली होती, मात्र आता ती वाढवून 30 जून करण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचनाही अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने जारी केली आहे. शिधापत्रिका आधारशी लिंक केल्यानंतर तुम्ही तुमच्या शिधापत्रिकेच्या मदतीने देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात रेशनच्या सुविधेचा लाभ घेऊ शकाल.
जर तुम्ही आधार आणि रेशन कार्ड लिंक केले नसेल तर ते लवकर पूर्ण करा. जर तुम्ही हे दोन्ही लिंक केले नाही तर तुमची मोफत रेशन सुविधा सरकार बंद करेल. त्याचबरोबर ‘वन कार्ड, वन नेशन’ योजना याअंतर्गत आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. याद्वारे तुम्ही कोणत्याही राज्यात आणि कोणत्याही जिल्ह्यात रेशन घेऊ शकाल. त्याचबरोबर आगामी काळात संपूर्ण यंत्रणेत अधिक पारदर्शकता अपेक्षित आहे.
रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याचा ऑनलाइन मार्ग:
»सर्वप्रथम तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट uidai.gov.in ला भेट द्यावी लागेल. येथे तुम्हाला 'स्टार्ट नाऊ' पर्याय मिळेल त्यावर क्लिक करा.
»यानंतर, तुमचे राज्य, जिल्हा आणि इतर आवश्यक माहिती प्रविष्ट करा.
»आता 'रेशन कार्ड' या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
»आता तुमचा शिधापत्रिका क्रमांक टाका. त्यानंतर आधार नोंदणीकृत मोबाईल क्रमांक भरा.
»तुम्हाला एक OTP मिळेल. OTP टाकल्यानंतर सबमिट करा. तुमचे रेशन कार्ड आधार कार्डशी यशस्वीरित्या लिंक केले जाईल.
रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करायची ऑफलाइन प्रोसेस:
»तुम्हाला आधार कार्डची एक प्रत आणि पासपोर्ट आकाराचा फोटो घ्यावा लागेल.
»यानंतर, या कागदपत्रांसह रेशन दुकानात जाऊन फॉर्म भरावा लागणार आहे.
»तेथे तुमचे बायोमेट्रिक पडताळले जाते.
»यानंतर तुमचे रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक केले जाईल.
»आधारशी रेशन लिंक करण्याबाबतची माहिती तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर संदेशाद्वारे दिली जाईल.
Published on: 29 May 2022, 11:14 IST