Others News

शासनाकडून रेशनकार्ड (Ration Card) धारकांना अत्यल्प दरात रेशन दिले जाते. रेशनकार्डला आधार कार्ड लिंक (Aadhaar card) करण्याची शेवटची तारीख 31 मार्च ठेवण्यात आली होती मात्र आता ती 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.

Updated on 14 May, 2022 12:44 PM IST

नवी दिल्ली : शासनाकडून रेशनकार्ड (Ration Card) धारकांना अत्यल्प दरात रेशन दिले जाते. रेशनकार्डला आधार कार्ड लिंक (Aadhaar card) करण्याची शेवटची तारीख 31 मार्च ठेवण्यात आली होती मात्र आता ती 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना विभागाने जारी केली आहे.

केंद्र सरकारच्या 'वन नेशन वन रेशन कार्ड' (One Nation One Ration Card) योजनेअंतर्गत देशातील लाखो लोकांना लाभ दिला जात आहे. रेशनकार्डचे आणखी बरेच फायदे होणार आहेत. तुमचे आधार कार्ड रेशनकार्डला लिंक केल्यानंतर, 'वन नेशन वन रेशन कार्ड' योजनेअंतर्गत देशातील कोणत्याही राज्यातील रेशनकार्ड दुकानातून रेशन घेता येणार आहे.

बिग ब्रेकिंग : गव्हाच्या निर्यातीवर बंदी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

आधार कार्ड ऑनलाइन कसे लिंक करावे

  • सर्वप्रथम तुम्हाला आधार कार्ड uidai.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
  • आता तुम्हाला 'Start Now' वर क्लिक करावे लागेल.
  • आता तुमचा पत्ता भरावा लागेल.
  • आता तुम्हाला 'रेशन कार्ड बेनिफिट' या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • आता आधार कार्ड क्रमांक, शिधापत्रिका क्रमांक, ई-मेल पत्ता आणि मोबाईल क्रमांक इत्यादी भरावे लागतील.
  • आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP प्राप्त होईल.
  • येथे OTP भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर प्रक्रिया पूर्ण झाल्याचा संदेश मिळेल.

तुम्ही ही ऑफलाइन लिंक करू शकता

तुम्ही ऑफलाइन माध्यमातून तुमचे रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याचाही लाभ घेऊ शकता. त्यासाठी आधार कार्डची प्रत, शिधापत्रिकेची प्रत आणि शिधापत्रिकाधारकाचा पासपोर्ट आकाराचा फोटो अशी महत्त्वाची कागदपत्रे घेऊन शिधापत्रिका केंद्रावर जमा करणे आवश्यक मानले जाते.

Wether Update : मान्सूनचे केरळमध्ये दणक्यात होणार आगमन; आणि महाराष्ट्रात...

English Summary: Ration card holders will benefit greatly
Published on: 14 May 2022, 12:44 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)