भविष्याच्या आर्थिक सुरक्षेसाठी बचत एक फार मोठी महत्वाची बाब आहे. आपण पाहिले की कोरोना सारख्याच जीवघेण्या संसर्गजन्य आजारांमध्ये प्रत्येकालाच आपल्या भविष्याची चिंता आहे. कधी कोणतं संकट येईल आणि कधी पैशांची गरज भासेल हे सांगणे कठीण आहे
त्यासाठी गुंतवणूक करणे आणि व्यवस्थित नियोजन बद्ध बचतीची सवय लावणे फार महत्त्वाचे आहे. तुम्ही केलेल्या बचतीच्या माध्यमातून गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय आहे. सध्या आपण मार्केटचा विचार केला तर मार्केटमध्ये बऱ्याच गुंतवणूक योजना आहेत. परंतु यामध्ये सगळ्यात फायदेशीर गुंतवणूक पर्याय म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणे हा होय. पोस्ट ऑफिसच्या तशा अनेक गुंतवणूक योजना आहेत. योजना म्हणजे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही होय.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राचे फायदे
या योजनेत तुम्ही फक्त अल्प प्रमाणात गुंतवणूक करू शकता आणि काही वर्षात चांगला नफा मिळू शकतात. पोस्ट ऑफिस मध्ये तुमचे खाते पूर्णपणे सुरक्षित असते, अशा परिस्थितीत मी कोणत्याही जोखीम शिवाय इथे गुंतवणूक करू शकता. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेची मुदतपूर्ती पाच वर्षे आहे.
यामध्ये महत्त्वाचे म्हणजे अशा काही महत्त्वाच्या गरजांसाठी तुम्ही अटी आणि नियमांचे पालन करत एक वर्षाच्या मॅच्युरिटी कालावधीनंतर ही तुमची रक्कम काढू शकता. आर्थिक वर्षाच्या प्रत्येक तिमाहीच्या सुरुवातीस राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ती व्याज दर सरकार ठरवते.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र चा व्याजदर
या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही यामध्ये फक्त शंभर रुपये गुंतवणूक करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेच्या माध्यमातून केलेल्या गुंतवणुकीवर दरवर्षी 6.8 टक्के व्याज दिले जाते.
दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर आयकर कलम 80 सी अंतर्गत तुम्हाला वर्षाला दीड लाख रुपयांची कर सूट देखील मिळू शकते. या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी 100, 500, 1000, पाच हजार आणि दहा हजार रुपयांचे गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्ही करत असलेल्या जास्तीत जास्त गुंतवणूकिला ही मर्यादा नाही. या योजनेतून सुरुवातीला पैसे मोजावे लागतात.जर तुम्ही सुरुवातीला या योजनेत 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला 6.8टक्केव्याज मिळेल. म्हणजेच पाच वर्षानंतर तुम्हाला 20.85 लाख रुपये म्हणजे एक हजार रुपये मिळतील.
Published on: 17 December 2021, 09:47 IST