Others News

मंगल कार्यांसाठी शुक्रवार शुभ असेल. तुमचं मन प्रसन्न होईल. बर्‍याच दिवसानंतर तुम्हाला कुणाला तरी भेटण्याची संधी मिळेल. नवीन काम सुरू करणे फायद्याचे ठरेल. कोर्टाच्या खटल्यांमधून सुटका होऊ शकते. दिवस चांगल्या बातमीने प्रारंभ होणार आहे.

Updated on 29 July, 2022 10:55 AM IST

मेष- मंगल कार्यांसाठी शुक्रवार शुभ असेल. तुमचं मन प्रसन्न होईल. बर्‍याच दिवसानंतर तुम्हाला कुणाला तरी भेटण्याची संधी मिळेल. नवीन काम सुरू करणे फायद्याचे ठरेल. कोर्टाच्या खटल्यांमधून सुटका होऊ शकते. दिवस चांगल्या बातमीने प्रारंभ होणार आहे.

वृषभ- नवीन काम सुरू करण्यासाठी शुभ दिवस आहे. दिवस अतिशय खास बनविण्यासाठी तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवाल, मन प्रसन्न होईल. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. काही नवीन काम सापडेल.

मिथुन- तुमचा दिवस चांगला सुरू होणार आहे. तुम्हाला व्यवसायात देखील फायदा होणार आहे. याशिवाय नोकरीत पदोन्नती मिळेल. उधार दिलेले पैसे परत मिळतील. मित्र किंवा कुटुंबियांसह तुमचा चांगला प्रवास होईल, एकमेकांशी चांगला वेळ घालवाल.

हे ही वाचा 
Monkeypox: मंकीपॉक्सचा कहर जगासाठी धोकादायक; 'ही' लक्षणे आढळल्यास त्वरित करा उपाय

कर्क- शिक्षण घेण्याऱ्यांसाठी शुक्रवार चांगला दिवस आहे. परिश्रमानुसार यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची योजना यशस्वी होईल. दिवसाची सुरुवात आत्मविश्वासाने होईल. कुटुंबाचं प्रेम आणि सहकार्य मिळेल.

सिंह- तुमचा दिवस चांगला जाईल. व्यवसायात फायदा होईल. नोकरीची परिस्थिती देखील चांगली राहील. तुम्हाला हवं तसं कामाचं फळ तुम्हाला मिळेल. कार्यक्षेत्रात आज पैशाची प्राप्ती होईल. मित्र, कुटुंबातील सदस्य आणि सहकारी तुम्हाला मदत करतील.

कन्या- आज आरोग्याची काळजी घ्या. धावपळ करु नका. दिवस आनंदाचे आहेत. आयुष्यात आनंदाची बरसात होणार आहे. धनलाभ होण्याची संधी आहे.

तूळ- हुशारीचा वापर करून काम केलं तर त्यात तुम्हाला नक्की यश मिळेल. मोठे व्यवहार टाळा. आज शक्यतो आराम करा. अधिकचा ताण घेऊ नका. गोष्टी मनाजोग्या होतील फक्त थोडा वेळ द्या.

हे ही वाचा 
Fish Rice Farming: मत्स्य भातशेतीतून शेतकरी कमवतोय दुप्पट पैसा; जाणून घ्या 'या' शेतीबद्दल

वृश्चिक- नव्या विचारानं पुढे जा. कामाच्या बाबतीत काही नवे व्यवहार कराल. भावनांवर नियंत्रण ठेवा. तुमच्या भावनांचा गैरफायदा कोणालाही घेऊन देऊ नका.

धनु- शुक्रवार तुमच्यासाठी चांगला दिवस असेल. कामात यश मिळवून लाभ होईल. तुम्ही स्तुतीस पात्र ठरेल. भाग्य तुमच्या सोबत असणार आहे. कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. वैवाहिक जीवनाचा आनंद घ्याल.

मकर- आज तुमच्या नेतृत्त्वंक्षमतेची परीक्षा आहे. महत्त्वाची कामं मार्गी लागतील. अडकलेले पैसे परत मिळतील. कोणालाही कमी लेखू नका. प्रत्येकाचे आभार माना.

कुंभ- तुमचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. मंगल कार्यात तुम्ही भाग घ्याल. कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक केलं जाईल. शिक्षण आणि स्पर्धा क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांकडून सर्व शक्य सहकार्य मिळेल.

मीन- कुटुंबाकडून आज सुख मिळेल. मंगल कार्य किंवा समारंभात सामील व्हाल. एखाद्या विशेष व्यक्तीशी भेटणं आठवणीत राहील. कामासाठी दिवस चांगला आहे, नवीन उत्साह आणि उत्साह मनामध्ये दिसेल. प्रेम संबंधात यश मिळेल.

महत्वाच्या बातम्या 
Central Govt Scheme: ...तर घर बसल्या डाउनलोड करा 'हे' कार्ड; सरकार देतंय 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार
Post Office: पोस्ट ऑफिस ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; लागू झाला 'हा' नवीन नियम
Business: फक्त 10 हजार रुपयात सुरू करा 'हा' व्यवसाय, वर्षभर होईल कमाई

English Summary: RashiFuture People zodiac sign may wealth Know about Zodiac
Published on: 29 July 2022, 10:55 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)