Others News

Raju Srivastav : मनोरंजन विश्वातून चटका लावणारी बातमी समोर आली आहे. गेल्या महिनाभरापासून मृत्यूशी झुंज देत असलेले प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं आज निधन झालं. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Updated on 21 September, 2022 11:03 AM IST

Raju Srivastav : मनोरंजन विश्वातून चटका लावणारी बातमी समोर आली आहे. गेल्या महिनाभरापासून मृत्यूशी झुंज देत असलेले प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं आज निधन झालं. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांना बरं करण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र या प्रयत्नांना यश आले नाही. अखेर आज राजू श्रीवास्तव यांची प्राणज्योत मालावली.

जीममध्ये वर्कआउट करत असताना हृदयविकाराचा झटका आलेल्या राजू श्रीवास्तव यांना १० ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोमात गेलेल्या श्रीवास्तव यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते.

कॉमेडियन राजू श्रीवास्तव करियर

1. 1989 मध्ये रिलीज झालेल्या मौने प्यार किया या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली.

2. राजू श्रीवास्तव हे त्यांच्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कार्यक्रमामधून ते प्रेक्षकांच्या भेटीस आले.

3. मैंने प्यार किया आणि बाजीगर या चित्रपटांमध्ये राजू श्रीवास्तव यांनी काम केलं.

4.'बिग बॉस 3', 'नच बलिए' आणि 'कॉमेडी नाइट्स विद कपिल' या कार्यक्रमामध्ये देखील राजू यांनी सहभाग घेतला होता.

English Summary: Raju Srivastav : Comedian Raju Srivastav behind the scenes
Published on: 21 September 2022, 11:03 IST