संपूर्ण देशात सध्या नैऋत्य मान्सूनचं आगमन झालं आहे. देशात अनेक ठिकाणी पावसाचे आगमन झाले आहे. काही ठिकाणी पाऊसाने दडी दिलेली असली तरी बहुतांश ठिकाणी पावसाने चांगली हजेरी लावली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार गुजरात, झारखंड, सिक्कीम, पश्चिम बंगालच्या काही भागात पाऊसाने तुरळक हजेरी लावली आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमध्येही मेघगर्जनेसह तुरळक पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार चेन्नईमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. चेन्नई आणि तामिळनाडूच्या लगतच्या असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये पुढच्या पाच दिवसांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची चिन्हे आहेत. शनिवारी हवामान खात्याने सांगितले की, पुढच्या तीन दिवसांमध्ये दिल्लीत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस मध्य भारतातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडेल.
यामध्ये छत्तीसगड, मध्य प्रदेश, आणि विदर्भातील काही भागांचा यामध्ये समावेश आहे. छत्तीसगडमध्ये 3 ते 6 जुलै दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे. विदर्भात 5 ते 7 जुलै, पूर्व मध्य प्रदेशात 4 ते 7, झारखंड, सिक्कीम, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये पुढच्या पाच दिवस, ओडिशामध्ये 3 ते 7 जुलै दरम्यान पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापूर, साताऱ्यातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा तर औरंगाबाद जिल्ह्यात ‘कही खुशी कही गम’ असा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
देशात अनेक ठिकाणी पावसाचे आगमन झाले आहे. काही ठिकाणी पाऊसाने दडी दिलेली असली तरी बहुतांश ठिकाणी पावसाने चांगली हजेरी लावली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार गुजरात, झारखंड, सिक्कीम, पश्चिम बंगालच्या काही भागात पाऊसाने तुरळक हजेरी लावली आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमध्येही मेघगर्जनेसह तुरळक पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Published on: 04 July 2022, 07:43 IST