Others News

मान्सूनने पहिला टप्पा पार केला असून आता दुसरा टप्पा सुरू झाला आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. पण पुढे पावसाची परिस्थिति कशी असणार आहे? शेतकऱ्यांच्या पिकांचे नियोजन काय? याबाबद हवामान खात्याने खुलासा केला आहे. याविषयी जाणून घेऊया.

Updated on 03 August, 2022 12:18 PM IST

मान्सूनने पहिला टप्पा पार केला असून आता दुसरा टप्पा सुरू झाला आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. पण पुढे पावसाची परिस्थिति (Rain Condition) कशी असणार आहे? शेतकऱ्यांच्या पिकांचे नियोजन काय? याबाबद हवामान खात्याने खुलासा केला आहे. याविषयी जाणून घेऊया.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार उर्वरित दोन महिन्यांमध्ये सरासरी एवढाच पाऊस पडेल असा अंदाज आहे. त्यामुळे दरवर्षी परतीचा होणारा पाऊस यंदा मात्र, जुलै महिन्यातच झाला असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मात्र आता ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सरासरीच्या तुलनेत 94 ते 100 टक्के पाऊस पडणार आहे असा अंदाज वर्तविला आहे.

हे ही वाचा 
Almond Farming: बदामाच्या ‘या’ जातीची शेती शेतकऱ्यांना बनवणार करोडपती; जाणून घ्या 'या' शेतीबद्दल...

जून महिना पूर्ण कोरडा गेला, जुलै मध्ये दमदार पाऊस (heavy rain) झाला आता सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज सर्वांनाच दिलासा देणारा आहे.

कारण उर्वरित काळात अतिवृष्टी, सततची ऱिमझिम असे चित्र नाही तर केवळ सरासरीच्या तुलनेत पाऊस राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे अंदाज जर खरा ठरला तर खरिपाची अपेक्षा कायम राहील.

हे ही वाचा 
Bater Rearing: अरे वा! अवघ्या 35 दिवसात मोठी कमाई; शेतकरी मित्रांनो 'या' लहान पक्षांचे करा पालन

त्यामुळे भात, तांदूळ, तूर, बाजरी, मका, कापूस, भुईमूग, रताळे, उडीद, मूग, चवळी, ज्वारी, तीळ, ग्वार, जूट,हरभरा, ऊस, सोयाबीन, भेंडी इ. पिकांची लागवड (Cultivation of crops) शेतकरी पावसाचा अंदाज घेऊन करू शकतात. मागच्या महिन्यात सरासरीच्या दुप्पट पाऊस झाल्याने खरीप पिकांना चांगला फटका बसलेला दिसून आला.

महत्वाच्या बातम्या 
50 Thousand: शेतीमध्ये चांगले उत्पादन घ्या आणि 50 हजार रुपये जिंका; जाणून घ्या पिकस्पर्धा योजनेबद्दल
Electric Car: काय सांगता! एका चार्जमध्ये जास्त रेंज देतेय 'ही' इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या 'या' कारबद्दल
Horoscope: 'या' राशीच्या लोकांसाठी आज धनलाभाचा योग; जाणून घ्या...

English Summary: Rain Condition second phase monsoon beneficial kharif crops
Published on: 03 August 2022, 12:11 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)